काय…! एक वडापाव आठ लाख रुपयांना…?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- हल्ली वडापाव हा अनेकांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. वडापाव आवडत नाही असा माणूस सापडणे तसे कठीणच. मात्र याच वडापावने पुण्यातील एका महिलेला तब्बल ८ लाखांचा जबरदस्त फटका बसला आहे.

सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग कारमध्येच ठेवून वडपाव आणण्यासाठी गेलेल्या या महिलेची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. त्यात तब्बल ८ लाखांचा ऐवज होता.

काल संध्याकाळी सातच्या सुमारास धनकवडी इथल्या अहिल्यादेवी चौकात ही घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, पुण्यातील एक महिला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी गेल्या होती, भावाला राखी बाधल्यानंतर संध्याकाळी आपल्या कारने घरी परतत असताना

सहकारनगर परिसरातील अहिल्यादेवी चौकात आल्यावर त्या महिलेस वडापाव खाण्याची इच्छा झाली. तेव्हा एका वडापावच्या दुकानासमोर त्या वडापाव घेण्यासाठी कार थांबवली व वडापाव घेण्यासाठी ती महिला खाली उतरली,दरम्यान गाडीत सोन्याचे दागिणे आणि काही रोकड असणारी एक बॅग होती.

कारमधून उतरत असताना त्यांनी ही बॅग डाव्या बाजूच्या सीटवर ठेवली चोरट्यांनी हीच संधी साधली आणि कारमध्ये ठेवलेली बॅग घेऊन धूम ठोकली.