ताज्या बातम्या

काय सांगता…सिम कार्ड शिवाय लॉन्च होणार Apple चे ‘हे ‘मॉडेल

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- अ‍ॅपल आयफोन 14 सीरिजमध्ये सिम कार्ड स्लॉट नसेल. अ‍ॅपल आपल्या नवीन आयफोन 14 सीरिजमधील फोनमध्ये सिम कार्ड स्लॉटऐवजी ई-सिमचा पर्याय वापरणार आहे.

अ‍ॅपल त्यांच्या पुढील सर्व सीरिज वॉटरप्रुफ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या कारणामुळेच आयफोन 14 सीरिजमध्ये ई-सिम दिले जात असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे येत्या काळात ई-सिम हा महत्त्वपूर्ण पर्याय युजर्सला उपलब्ध होऊ शकतो. दरम्यान भारतात एअरटेल (Airtel), वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) आणि जिओ (Jio) या तीनही टेलिकॉम कंपन्या ई-सिम सेवा ऑफर करतात.

अ‍ॅप्पलने यापूर्वीच ई-सिम फीचर असलेले स्मार्टफोन लॉंच केले आहेत. कंपनीने सर्वप्रथम आयफोन XS आणि आयफोन XS Max साठी ई-सिम फीचर लाँच केले.

नुकत्याच लॉंच झालेल्या आयफोन 13 सीरीजमध्ये कंपनीने फिजिकल सिम कार्ड स्लॉट व्यतिरिक्त ई-सिमचा पर्याय दिला आहे. या फोनमध्ये तुम्ही दोन सिम कार्ड वापरू शकता, त्यापैकी एक फिजिकल असेल आणि एक ई-सिम कार्ड असेल.

ई-सिम म्हणजे काय? जाणून घ्या :- भारतात रिलायन्स जियो, व्होडाफोन -आयडिया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्या ई-सिम सुविधा देत आहेत.

ई-सिम हे मोबाईल फोनमध्ये बसवण्यात आलेले व्हर्च्युअल सिम असते.

ई-सिम अगदी फिजिकल सिम कार्ड प्रमाणे काम करते.

जर तुम्ही ई-सिमसाठी अर्ज केला तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये कोणतेही अन्य सिमकार्ड घालावे लागणार नाही.

Ahmednagarlive24 Office