Farmer Success Story: कपाशी पिकासाठी अमृत पॅटर्नचा प्रयोग ! एकरी ५० क्विंटल कापूस उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story :- कपाशी हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

इतर पिकांप्रमाणेच कपाशीचे देखील भरघोस उत्पादन मिळावे याकरिता शेतकरी बंधू अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून तंत्रशुद्ध असे प्रयत्न करतात व उत्पादन मिळवतात. शेतीमध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे पीक लागवडीपासून ते व्यवस्थापनापर्यंत अनेक गोष्टींमध्ये क्रांतिकारी बदल झाले असून त्याचा प्रत्यक्षरीत्या उत्पादन वाढीवर परिणाम होतो.

अनेक प्रयोगशील शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग पीक उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून करतात आणि यशस्वी देखील होतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या शिऊर येथील कडूबा जाधव यांचा विचार केला

तर त्यांनी कपाशी पिकासाठी अमृत पॅटर्नचा प्रयोग करून पाहिला. त्यामुळे आता एकरी 30 ते 35 क्विंटल कापसाचे उत्पन्न त्यांना मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. नेमका हा अमृत पॅटर्न काय आहे? त्याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.

या शेतकऱ्याने कपाशी पिकासाठी वापरला अमृत पॅटर्न

याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील कडूबा जाधव यांची घरची चार एकर शेती आहे. परंतु या पट्ट्यामध्ये पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे आणि स्वतः कडुबा जाधव अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे हवे तेवढे उत्पादन त्यांना शेतीतून प्राप्त होत नव्हते.

उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला शेतात काय करता येईल या प्रयत्नात असतानाच त्यांना यवतमाळ येथील अमृतराव देशमुख या शेतकऱ्याने कपाशीसाठी अमृत पॅटर्न राबवला व याची माहिती त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली.

त्यामुळे कडूबा जाधव यांनी हा प्रयोग आपल्या शेतामध्ये करण्याचे निश्चित केले व त्या दृष्टिकोनातून पहिल्याच वर्षी त्यांनी बऱ्यापैकी हा प्रयोग यशस्वी केला. अमृत पॅटर्न चा वापर कपाशी पिकाकरिता केल्यामुळे त्यांना एकरी 30 ते 35 क्विंटल कापसाचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे व इतकेच नाही तर त्यांच्या शेतामध्ये जे काही कपाशीचे झाड आहे ते आठ ते नऊ फूट उंच इतके वाढले आहे.

कशा पद्धतीचे केले त्यांनी नियोजन?

या पॅटर्न मध्ये कडुबा जाधव यांनी कपाशी लागवडीकरिता नियोजन करताना चार फूट सरीच्या आड सहा फूट एक सरी याप्रमाणे चार बाय सहा या अंतरावर लागवड केली. या लागवडीमध्ये कपाशीच्या बियाण्याचे निवड करताना त्यांनी ते 180 दिवसात म्हणजेच उशिरा परिपक्व होईल अशा बियाण्याची निवड करून त्याची लागवड केली.

तसेच वापरत असलेले कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा वापर हा कपाशी पिकाची अवस्था आणि गरज पाहून केली व एकरी एक ट्रॉली शेणखत शेताला टाकले. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकचा वापर केला व कपाशीच्या झाडांना टोमॅटो सारखं बांबू आणि तारांच्या मदतीने त्यांनी बांधले.

सध्या कापसाची वेचणी सुरू झाली असून एका झाडाला 70 ते 80 बोंडे असून तीस ते पस्तीस फांद्या आहेत. या पॅटर्न करिता कडुबा जाधव यांना हे एका एकराला 12 ते 15 हजार रुपये खर्च आलेला आहे.

याबाबत कडूबा जाधव काय म्हणाले?

या पॅटर्न बद्दल बोलताना त्यांनी म्हटले की त्यांचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे त्यांनी चार बाय सहा चे अंतर निवडले. परंतु यामुळे या सर्‍या एकमेकांमध्ये मिसळल्या व पिकाची हवी तेवढी वाढ झाली नाही.

कारण अमृत पॅटर्ननुसार ही लागवड सात बाय पाच वर असायला हवी होती असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढच्या हंगामापासून खते व औषधे याचे नियोजन व्यवस्थित करून यावर्षी जी काही कमी राहिली त्यात सुधारणा करून एकरी 50 क्विंटल कापूस पुढच्या वर्षी काढायचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला.