अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- गेल्या काही दिवसांत पावसानं दडी मारली होती. मात्र एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात आज सर्वत्र पाऊस असणार अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कुलाबा वेधशाळेनं यासंदर्भात इशारा दिला आहे. आज आणि उद्या उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय.

तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्य अंदाजानुसार आज सलग दुसऱ्या दिवशीही भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.

कुठे कुठे आज कोणता अलर्ट

: यलो अलर्ट : (15-64 मिमीपर्यंत पावसाची शक्यता)

कोकण : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव

मराठवाडा : औरंगाबाद, जालना

विदर्भ : बुलढाणा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर

ऑरेंज अलर्ट : (64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता)

विदर्भ – यवतमाळ (एक, दोन ठिकाणी अतिमुसळधार)