अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- नवरा बायकोचे भांडण प्रमाणापेक्षा जास्त ताणलं गेलं की संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. काही वेळा तर एक छोटसं कारणही पती-पत्नीमध्ये भांडण होण्यासाठी पूरेसं ठरतं.

असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला असून भांडण पत्नीच्या जीवावर बेतलं आहे. मुळचा सोलापूरचा असलेला गहिनीनाथ सरवदे काही महिन्यांपूर्वी पत्नी प्रतीक्षा सरवदे हिच्यासोबत पुण्यात रहाण्यास आला होता.

त्यांना एक मुलगा आहे. सरवदे हा पुण्यात खासगी ठिकाणी नोकरी करतो. लग्नानंतर सरवदे हा पत्नीला पुण्याला घेऊन जात नव्हता. त्यावरून दोघांमध्ये वाद होत होते.

त्यानंतर काही काही महिन्यांपूर्वीच गहिनीनाथ पत्नी प्रतीक्षाला घेऊन पुण्यात आला. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील सिंहगड व्हिलामध्ये ते रहात होते.

दोन दिवसांपूर्वी गहिनीनाथने ऑफिसवरून येताना पाणीपुरीचं पार्सल आणले होते. पण मला न विचारता पाणीपुरी आणल्याचा पत्नी प्रतिक्षाला राग आला आणि तिने पाणीपुरी खाण्यास नकार दिला.

पाणीपुरीवरुन दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. वादातून प्रतीक्षाने राहत्या घरात विष प्राशन केलं. त्यानंतर तिला तात्कळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान प्रतीक्षाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं.