अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा जास्त प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी फक्राबाद येथे ९९ लाख रुपयांचे आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन झाले.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत – जामखेड मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासाठी माझा प्रयत्न आहे.

ग्रामीण भागात निर्माण होत असलेल्या दळणवळणाच्या सुविधांमुळे अागामी काळात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकायचा आहे.

तसेच चौंडी – गिरवली – कवडगाव – अरणगाव – पारेवाडी – डोणगाव बावी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन अरणगाव येथे दि २५ रोजी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले.

सुमारे १ कोटी ३५ लाख रुपये खर्चून हा रस्ता होणार आहे. यावेळी कार्यक्रमात आमदार रोहित पवार बोलत होते, आमदार रोहित पवार यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.