अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- जिल्ह्यात पुन्हा गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याचा वावर हा जास्त प्रमाणात आढळून येत आहे.

या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याची संख्या वाढली आहे. बिबट्याचे पाळीव प्राण्यावरील आणि माणसावरील हल्ले वाढल्याने, या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

यातच एक दिलासादायक बाब म्हणजे राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे दीड वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद करण्यात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, लोणी खुर्द गावाच्या पश्चिमेकडील घोगरे वस्तीवर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते.

या परिसरात बिबट्याने अनेक शेळ्या, वासरे, पाळीव व फिरस्ती कुत्रे यांचा फडशा पाडला होता. याबाबत वनविभागाला कळवून तातडीने पिंजरा लावण्याची व्यवस्था केली.

सोमवारी त्यात बिबटया जेरबंद झाल्यानंतर दोन बिबटे पिंजऱ्याभोवती फिरताना काही नागरिकांनी बघितले. त्यामुळे या भागातील बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे.

हा भाग गावाला अगदीच जोडून असल्याने याचे गांभीर्य अधिक आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळची पाहणी केली हं .