Aadhaar Card Update : आधार कार्डमध्ये असलेली माहिती किती वेळा बदलता येते?; जाणून घ्या महत्वाचा नियम !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar Card Update : तुम्हाला तुमचे आधार कार्ड उपडेट करायचे असेल तर तुम्ही सेवा केंद्राला भेट देऊन ते अपडेट करू शकता. तुमची माहिती ऑनलाइन अपडेट करण्यासाठी, तुमच्याकडे तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला नोंदणीकृत मोबाइल नंबर असणे फार आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही आधी नंबर लिंक करून तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. नंबर लिंक केल्यानंतर तुम्ही UIDAI वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तुमची माहिती अपडेट करू शकता.

आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयाची खास ओळख आहे, आधार कार्ड शिवाय कोणतेच महत्वाचे काम पूर्ण होत नाही. जसे की, बँक खाते उघडणे, सरकारी योजनेचा लाभ घेणे, महाविद्यालयात प्रवेश घेणे, कर्जासाठी अर्ज करणे किंवा घर खरेदी करणे यासारख्या गोष्टी करता येत नाहीत. अशातच जर तुमच्याशी संबंधित माहिती आधार कार्डमध्ये चुकीच्या पद्धतीने टाकली गेली, तर तुमचे काम अर्धवट राहू शकते. अशातच तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता.

पण जन्मतारीख असो किंवा नाव बदलणे असो, प्रत्येकासाठी काही नियम आहेत. आपण त्यांना पुन्हा-पुन्हा दुरुस्त करू शकत नाही. त्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्हाला तुमची जन्मतारीख किंवा तुमच्या आधारमध्ये तुमचे नाव अपडेट करायचे असेल, तर त्यासाठी काय नियम आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला हे माहित आहे का? कोणताही आधार कार्डधारक त्याच्या आयुष्यात फक्त दोनदाच नाव बदलू शकतो. याशिवाय आधार कार्डमध्ये जन्मतारखेची माहितीही देण्यात आली आहे. जन्मतारखेत बदल आयुष्यात फक्त दोनदाच करता येतो. आधार कार्डमध्ये लिंग अपडेट करण्याची सुविधा फक्त एकदाच दिली जाते. ही सर्व माहिती अपडेट करण्याची मर्यादा UIDAI ठरवते.

नाव बदलण्यासाठी अर्ज कसा करावा?

जर तुम्हाला आधार कार्डमध्ये तुमचे नाव बदलायचे असेल तर सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा आणि लॉगिन करा. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. त्यानंतर आधार कार्डमध्ये नोंदणी केलेल्या क्रमांकावर एक ओटीपी येईल. पुढे Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. त्यानंतर आधार कार्डमध्ये नोंदणी केलेल्या क्रमांकावर एक ओटीपी येईल. पुढे Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा. नवीन पृष्ठ उघडल्यानंतर, नाव बदला पर्याय निवडा आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि संलग्न करा. यानंतर सबमिट करा आणि ओटीपी पाठवा पर्याय निवडा. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ओटीपी टाकल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवाय कोणताही बदल होणार नाही

आधार कार्डमधील कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी आधार कार्डमध्ये योग्य मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये बदल करताना तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाकल्याशिवाय नाव, पत्ता इत्यादी कोणतीही माहिती अपडेट करणे शक्य नाही.