खुशखबर ! आता TATA बनवणार IPhone, किमती होणार स्वस्त, जाणून घ्या कंपनीची प्लॅनिंग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata made iPhone in India : आयफोनची क्रेझ काही निराळीच. आयफोन घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु याची किंमत इतकी जास्त आहे की, ते अनेकांचे स्वप्नच राहते. परंतु आता एका नव्या रिपोर्टनुसार टाटा TATA हे देशातच आयफोन बनवणार आहेत.

त्यामुळे आयफोन एकदम स्वस्त मिळतील. होय, हे खरं आहे. संपूर्ण प्लॅन तयार आहे. यासाठी सरकार देखील टाटा समूहाला मदत करणार आहे. दोन दिवसांपूर्वी इंडिया मोबाइल काँग्रेसच्या (IMC) कार्यक्रमात सरकारने माहिती दिली होती की,

टाटा समूह देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी भारतात अॅपल आयफोन बनवणार आहे. तेव्हापासून आयफोनप्रेमी सोशल मीडियावर सातत्याने प्रश्न विचारत आहेत की त्यांना आता स्वस्तात आयफोन मिळतील का? तर याचे उत्तर होय असे आहे.

* मेक इन इंडिया अंतर्गत टाटांना मदत

टाटा समूह ही भारतीय कंपनी असल्याने मेक इन इंडिया अंतर्गत भारत सरकार त्यांना काही प्रमाणात कर सवलत देऊ शकते, असे वृत्त आहे. त्यामुळे किंमत थोडी कमी होऊ शकते. सध्या Wistron ही कंपनी भारतात आयफोन बनवत होती, जी आता टाटा समूहाने विकत घेतली आहे.

* टाटाने 600 मिलियन डॉलरमध्ये केली डील

Wistron सोबत झालेल्या डील मुळे टाटा समूह भारतात आयफोन तयार करणारी पहिली कंपनी ठरली आहे. गेल्या वर्षभरापासून या कराराची चर्चा सुरू आहे. अंदाजे 600 मिलियन डॉलर्समध्ये हा करार झाला होता.

मार्च 2024 पर्यंत विस्ट्रॉन कर्नाटकातील आपल्या कारखान्यात 1.8 बिलियन डॉलरचे आयफोन बनवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयफोन 15 ची निर्मिती विस्ट्रॉन फॅक्टरीमध्ये केली जाणार आहे. या कारखान्यात सुमारे 10 हजार कर्मचारी काम करतात.

* टाटा सध्या आयफोन 15 बनवणार, आयफोन 15 प्रो चीनमध्ये बनवला जाईल

कंपनी सध्या फक्त आयफोन 15 बनवत आहे. सध्या आयफोन 15 प्रो फक्त चीनमध्येच बनवला जाणार आहे. पण येत्या काही महिन्यांत आयफोन 15 प्रोची जबाबदारीही टाटाकडे सोपवली जाऊ शकते. त्यानंतर संपूर्ण डिमांड टाटा कडे शिफ्ट होईल.