Cibil Score : तुमचा सिबिल स्कोर कमी झाला आहे का ? वापरा ‘या’ टिप्स आणि वाढवा तुमचा सिबिल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cibil Score : आजकालच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला मोबाईल फोन घ्यायचा असेल किंवा एखादे शैक्षणिक कर्ज, वाहन खरेदी तसेच इतर आर्थिक गरजांमुळे जर कर्ज घ्यायची आवश्यकता पडली तर प्रत्येकालाच बॅंका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळते असे नाही. कारण यामध्ये तुमचा सिबिल स्कोर खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. जर तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला ताबडतोब अगदी सहजतेने कर्ज मिळते.

परंतु तुमचा सिबिल स्कोर जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात खूप समस्या निर्माण होतात. आपल्याला माहित आहेस की सिबिल स्कोर म्हणजे तुमच्या एकंदरीत आर्थिक व्यवहारांचा तो एक इतिहास असतो व त्याला क्रेडिट हिस्टरी असे देखील म्हणतात.

यामध्ये तुम्ही कर्ज घेतले तसेच तुम्ही किती खर्च करतात तसेच घेतलेले लोन तुम्ही वेळेवर परतफेड करत आहेत की नाही इत्यादी बाबींवर सिबिल स्कोर अवलंबून असतो. जर आपण सिबिल स्कोर पॅरामीटरचा विचार केला तर साधारणपणे तो 300 ते 900 या अंका दरम्यान मोजला जातो. जर यानुसार आपण वर्गीकरण पाहिले तर….

1- 300 पर्यंत सिबिल स्कोर असला तर- या लेवल पर्यंत सिबिल स्कोर असणे हे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टिकोनातून किंवा बँकिंगच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही.

2- तीनशे ते साडेपाचशेच्या आसपास सिबिल स्कोर असणे – यादरम्यानचा सिबिल स्कोर देखील चांगला मानला जात नाही म्हणजेच कर्ज मिळण्याच्या दृष्टिकोनातून याचे देखील महत्त्व खूप कमी आहे.

3- साडेपाचशे ते साडेसातशेच्या मध्ये- या सिबिल स्कोरला चांगला सिबिल स्कोर मानले जाते. या दरम्यान सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला सहजतेने कर्ज मिळू शकते.

4- साडेसातशे ते 900 च्या मध्ये- ज्या व्यक्तीचा या रेंजमध्ये सिबिल स्कोर असतो तो खूप उत्तम आणि चांगला समजला जातो व कोणत्याही वेळी तुम्हाला अगदी सहजतेने बँका लोन देतात.

या टिप्स फॉलो करा आणि तुमचा सिबिल स्कोर वाढवा

1- कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे- जर तुम्ही कोणत्याही बँक या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे व त्याची परतफेड तुम्ही वेळेवर करत नाही आहात तर या गोष्टीचा विपरीत परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होतो. जर तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेवर परतफेड करत आहात तर हे तुमच्या क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल स्कोर वाढवण्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर परत करावेत.

2- घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरायला वेळ करू नये- जर तुम्ही हप्त्यावर एखादे उत्पादन किंवा घर तसेच गाडी खरेदी केलेली आहे तर तुमचे जे काही ईएमआय अर्थात हप्ते असतात ते दिलेल्या वेळेत भरणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही ईएमआय वेळेवर भरला नाही तर त्याचा नकारात्मक परिणाम सिबिल स्कोर होतो. जर तुम्ही वेळेवर ईएमआय भरले तर तुमचा सिबिल स्कोर ऑटोमॅटिक वाढतो.

3- तुमचा सिबिल स्कोर तपासावा आणि चुका दुरुस्त करावेत- तुम्ही वेळोवेळी तुमचा सिव्हिल रिपोर्ट चेक करणे गरजेचे आहे. याच्यामध्ये काही दोष किंवा चुका असतील तर त्या सुधारणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा आपण घेतलेले कर्जाची परतफेड आपण पूर्ण केलेली असते परंतु कर्ज खाते बंद केलेले नसते. या गोष्टीचा देखील नकारात्मक प्रभाव हा सिबिल स्कोर होतो. त्यामुळे कर्ज परतफेड झाल्यानंतर तुम्ही घेतलेले कर्ज खाते पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे.

4- एखाद्याच्या कर्जाला जामीनदार किंवा गॅरेंटर होण्यापासून वाचा- जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कर्ज घेण्यासाठी जामीनदार किंवा गॅरेंटर असाल व त्या व्यक्तीने जर वेळेवर कर्ज परतफेड केली नाही तर त्याचा देखील विपरीत परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होतो. याशिवाय तुमचे जॉइंट अकाउंट आहे आणि तुमच्या सोबतच्या व्यक्तीने जर लोन डिफॉल्ट केले तरी तुमचा क्रेडिट स्कोर झपाट्याने कमी होतो. त्यामुळे एखाद्याला कर्जासाठी जामीनदार किंवा गॅरेंटर होणे टाळावे.

5- क्रेडिट कार्डच्या लिमिटपेक्षा 30 टक्केच वापर करणे फायद्याचे- तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल व त्याचा जो काही लिमिट आहे त्या लिमिटच्या 30% च वापर करणे गरजेचे आहे. जर तुम्ही 30% पेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर करत असाल क्रेडिट कार्डचे बिल भरण्याचे जी काही सायकल असते ती पूर्ण होण्याआधीच क्रेडिट कार्डचे बिल भरणे गरजेचे आहे. तुम्ही अशा पद्धतीने बिल भरले तर तुमचा सिव्हिल स्कोर खूप चांगल्या पद्धतीने वाढतो.

अशा पद्धतीने जर तुम्ही या पाच टिप्स फॉलो केल्या तर नेहमी तुमचा क्रेडिट स्कोर हा वाढत राहील आणि कधीही तो कमी होणार नाही.