Home Care Tips: घरात झुरळांनी नुसता ताप आणलाय? फक्त ‘या’ सोप्या गोष्टी करा आणि झुरळापासून मुक्तता मिळवा, जाणून घ्या माहिती

प्रत्येक व्यक्ती आपल्या राहत्या घराची स्वच्छता व्यवस्थितपणे ठेवतात. स्वच्छता ठेवताना ती घरातच नाही तर घराच्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवण्याकडे प्रकर्षाने लक्ष दिले जाते. परंतु एवढी स्वच्छता ठेवून देखील घरामध्ये लाल मुंग्या तसेच पाली व झुरळांचा सुळसुळाट खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

Ajay Patil
Published:
home care tips

Home Care Tips:- प्रत्येक व्यक्ती आपल्या राहत्या घराची स्वच्छता व्यवस्थितपणे ठेवतात. स्वच्छता ठेवताना ती घरातच नाही तर घराच्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवण्याकडे प्रकर्षाने लक्ष दिले जाते. परंतु एवढी स्वच्छता ठेवून देखील घरामध्ये लाल मुंग्या तसेच पाली व झुरळांचा सुळसुळाट खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

त्यातल्या त्यात उंदीरांचा प्रादुर्भाव देखील खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो. या सगळ्या कीटकांमुळे घरात खूप मोठ्या प्रमाणावर बऱ्याच गोष्टींचे नुकसान होते.

यामध्ये झुरळांच्या अनुषंगाने बघितले तर घरातील स्वयंपाक घरामध्ये यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर असतो. काही कालावधीनंतर झुरळांनी जर पिल्लांना जन्म दिला तर यांची संख्या दुप्पट ते तिप्पट वाढते व मोठ्या प्रमाणावर मनस्तापाला सगळ्यांना सामोरे जावे लागते.

त्यामुळे अशा कीटकांचा किंवा झुरळांचा नायनाट करण्यासाठी अनेक प्रकारचे स्प्रे  वापरले जातात व त्यासोबत अनेक उपाययोजना देखील केल्या जातात.

परंतु हवा तेवढा फायदा होताना दिसून येत नाही. याकरीता आपण या लेखामध्ये अशा सोप्या गोष्टी बघणार आहोत, त्याचा वापर केल्यामुळे झुरळांचा नायनाट होण्यास मदत होईल व घरातून झुरळांचा प्रादुर्भाव कमी होईल.

 या सोप्या गोष्टींचा वापर करा आणि घरातून झुरळे घालवा

1- लसुनचा वापर यामध्ये लसुन घेऊन तो बारीक करून घ्यावा व त्यात विनेगर घालावे. त्यानंतर हा स्प्रे एका बाटलीत भरावा व ज्या ठिकाणी झुरळ फिरतात त्या ठिकाणी फवारावा. या स्प्रे मुळे झुरळे मरतात व हळूहळू त्यांची संख्या कमी होते.

2- बोरिक एसिड पावडर झुरळांचा नायनाट करण्यासाठी बोरिक ऍसिड पावडरचा देखील खूप फायदा होतो. या पावडरचा वापर करताना बाजारातून बोरीक ॲसिड पावडर विकत आणून ती पावडर मैदा मध्ये घालून त्या मैद्याच्या गोळ्या बनवाव्यात. ज्या ठिकाणी झुरळ जास्त दिसतात त्या ठिकाणी त्या गोळ्या ठेवाव्यात.

3- लाल तिखटचा वापर लाल तिखटचा वापर करताना पाण्यात लाल तिखट मिसळून घ्यावे व ते मिश्रण एका प्रे बाटलीमध्ये भरावे व घरात ज्या ठिकाणी झुरळ जास्त असतील त्या ठिकाणी या पाण्याचा स्प्रे बाटलीच्या साह्याने फवारा करावा. अशाप्रकारे लाल तिखटच्या पाण्यापासून तुम्ही झुरळांचा बंदोबस्त करू शकतात.

5- कापूरचा वापर घरातील झुरळांचा नायनाट करण्यासाठी कापूर देखील फायद्याचे ठरते. याकरिता कापूर अगोदर बारीक करून त्याची पावडर बनवून घ्यावी.

घरात ज्या ठिकाणी झुरळे फिरतात त्या ठिकाणी ही कापूर पावडर ठेवून द्यावी. ज्या ठिकाणी तुम्हीही पावडर ठेवाल त्या ठिकाणी झुरळ येतच नाही व त्या ठिकाणहून लांब जाते.

6- लिंबाच्या रसाचा वापर घरामधील झुरळाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किंवा झुरळांचा नायनाट करण्यासाठी लिंबूचा रस देखील खूप फायद्याचा ठरतो.

लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते व लिंबाच्या रसाचा ताजा वास झुरळांना आकर्षित करून मारण्यास फायदेशीर ठरतो. त्यामुळे लिंबाचा रसाचा वापर करून देखील तुम्ही झुरळांचा बंदोबस्त करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe