Home Remedies For Good Sleep : चांगल्या झोपेसाठी, रात्री झोपण्यापूर्वी करा “या” खास पेयाचे सेवन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Remedies For Good Sleep : मोबाईच्या या युगात शांत झोप येणे खूप अवघड झाले आहे. तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे देखील चांगली झोप येत नाही, रात्री नीट झोप न लागणे, झोपेत अस्वस्थता तसेच वारंवार डोळे उघडणे यासारख्या समस्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. या अशा समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येतात.

PCOS, थायरॉईड आणि इतर हार्मोनल समस्यांमध्ये रात्री झोप न येणे खूप सामान्य आहे. तथापि, अति थकवा आणि तणाव अशी इतर कारणे देखील झोपेशी संबंधित समस्यांसाठी जबाबदार असू शकतात. अशातच प्रश्न पडतो, या समस्यांवर कशी मात करता येईल. आजच्या या लेखात आम्ही याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला या समस्यांवर कशी मात करता येईल हे सांगणार आहोत.

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या उपायाचे पालन केल्यास तुम्हाला पुन्हा, झोप न येण्याची तक्रार येणार आहे. आम्ही आज अशा घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्ही वापर केल्यास तुम्हाला चांगली आणि गाढ झोप घेण्यास मदत होईल.

चांगली आणि गाढ झोपेसाठी काय करावे?

रात्री चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी जर तुम्ही या पेयाचा तुमच्या आहारात समावेश केला तर या समस्येपासून तुम्हाला लेगच आराम मिळेल. कोणते आहे हे पेय आणि कसे बनवायचे चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

साहित्य

-कोरडे आले (1/4 टीस्पून)
-ज्येष्ठमध (1/2 टीस्पून)
-सिलोन दालचिनी (1/4 टीस्पून)
-अश्वगंधा (1/4 टीस्पून)

कृती

-एका पातेल्यात पाणी घ्या.
-1/4 टीस्पून कोरडे आले घाला.
-1/2 टीस्पून ज्येष्ठमध घाला.
-1/4 टीस्पून सिलोन दालचिनी घाला.
-त्यात 1/4 टीस्पून अश्वगंधा घाला.
-आता हे मिश्रण चांगले उकळा. त्यांनतर ते गाळून घ्या, आणि थंड झाल्यावर प्या.

कधी करायचे सेवन?

रात्री झोपण्याच्या 30 मिनिटे आधी या याचे सेवन करा. याने तुम्हाला रात्री चांगली झोप येण्यास मदत होईल.

या आयुर्वेदिक पेयाचे इतर फायदे-

-आल्यामध्ये जिंजरॉल असते, त्यामुळे हार्मोन्स उत्तेजित करण्यास मदत करते.
-लिकोरिस मेंदूला शांत करण्यास आणि मेलाटोनिनचे उत्पादन वाढविण्यास मदत करते.
-दालचिनी न्यूरोट्रांसमीटर संतुलित करण्यास आणि झोपेच्या चक्राचे नियमन करण्यास मदत करते.
-अश्वगंधा ही एक अनुकूलक औषधी वनस्पती आहे, जी मेंदूला शांत करते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.