IRCTC कडून भारी टूर पॅकेज ! अवघ्या काही हजारांत कोणार्क, पुरीसह अनेक ठिकाणचे दर्शन, विमानाने प्रवास थ्री स्टार हॉटेलमध्ये निवास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IRCTC Tour Package: जर तुम्ही फिरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भुवनेश्वरमधील चिल्का, कोणार्क आणि पुरी येथील धार्मिक स्थळे आणि मंदिरांना भेट देण्याचा विचार करत असाल तर मग आनंदाची बातमी आहे. आयआरसीटीसी तुम्हाला कोणार्क, चिल्का आणि पुरी ला अतिशय स्वस्त दरात फिरण्याची संधी देत आहे.

IRCTC चा हा दौरा 2 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा दौरा फ्लाइट टूर असेल. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर एसी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. इतकंच नाही तर या दौऱ्यात खाण्यापिण्याची आणि राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, थ्री स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आल्या आहेत. मार्गदर्शन आणि संरक्षणाची जबाबदारीही आयआरसीटीसी तर्फे केली जाईल.

* पॅकेज डिटेल

IRCTC ने या टूर पॅकेजला दिव्य पुरी टूर असे नाव दिले आहे. या टूर पॅकेजच्या प्रवासाच्या तारखांबद्दल पाहायचे झाले तर ते 2 नोव्हेंबर 2023, 14 डिसेंबर 2023, 25 जानेवारी 2024, 17 फेब्रुवारी 2024 आणि 15 मार्च 2024 असे निश्चित करण्यात आले आहे.

आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांचे असेल. या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण दोन्ही दिले जाईल. तसेच चिल्का, भगवान जगन्नाथ मंदिर, भुवनेश्वर आणि कोणार्क मंदिराला भेट दिली जाईल.

याशिवाय जवळपासची सर्व सुंदर ठिकाणे दाखवली जातील. दिल्ली ते भुवनेश्वर असा विमान प्रवास असेल. तिथे गेल्यावर तुम्हाला थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय होईल.

* जाणून घ्या किती येईल खर्च

टूर पॅकेजसाठी प्रति व्यक्ती 40,900 रुपये मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही 2 लोकांसोबत प्रवास करत असाल तर प्रति व्यक्ती 32,500 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही 3 लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 31,000 रुपये मोजावे लागतील. जर तुम्हाला या टूर पॅकेजबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल आणि हे टूर पॅकेज बुक करायचे असेल तर यासाठी तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.