मूल दत्तक घ्यायचंय मग ही बातमी वाचाच ! जाणून घ्या भारतात मूल दत्तक घेण्यासाठीची प्रक्रिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतात एखाद्याला मूल दत्तक घ्यायचं असेल तर त्यासाठीचे सर्वसाधारण नियम काय असतात? त्यासाठी कोण पात्र असतं? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? असे प्रश्न उपस्थित होतात.

साधारणपणे एखाद्या संस्थेमधून मूल दत्तक घेण्यासाठी संबंधित दाम्पत्याला अनेक कायदेशीर प्रक्रियांमधून जावं लागतं.वंध्यत्वासह अन्य कारणांमुळे नवदाम्पत्याला मूल न होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता मूल दत्तक घेण्याचेही प्रमाण वाढले आहे.

दत्तक घेण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आता सेंट्रलाइज अर्थात केंद्रीभूत करण्यात आली आहे. त्याची माहिती अनेकांना नसल्याने ते नजीकच्या केंद्रात मुले दत्तक घेण्यासाठी जातात. मात्र, आता ही संपूर्ण प्रक्रिया इच्छुक पालकांना ऑनलाइन करता येते.

मूल दत्तक घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यात मुलींना सर्वाधिक पसंती दिली जाते. गत दशकापर्यंत ‘वंशाचा दिवा’ म्हणून मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु आता अनेक दाम्पत्यांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे असल्याचे दिसून येते.

ऑनलाइन नोंदणी कोठे कराल ?
ज्या दाम्पत्याला मूल दत्तक घ्यायचे असते, त्यांनी संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन केल्यानंतरच या प्रक्रियेला प्रारंभ होतो. त्यानंतर महिनाभरात दाम्पत्याची, त्याच्या कुटुंबाची त्यांच्या घरी जाऊन संबंधित संस्थेमार्फत चौकशी केली जाते. त्यांनी दत्तकसाठी सकारात्मक अहवाल दिल्यानंतरच ऑनलाइन माहिती अपलोड करून वेटिंग पिरियडला प्रारंभ होतो. सध्या साधारणपणे ३ वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी मूल दत्तक घेण्यासाठी लागतो.

कोण घेऊ शकतात मुलांना दत्तक ?
प्रत्येकाला मूल दत्तक घेता येत नाही. याचे काही नियम आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्याचे वय आहे. ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जोडप्यांना बाळ दत्तक दिले जात नाही. ज्या पालकांच्या वयाची बेरीज ९० येते, अशांना ० ते २ वयोगटातील मुले दत्तक दिली जातात. तसेच ज्यांच्या वयाची बेरीज ९० ते शंभर येते, अशांना २ ते ४ वयोगटातील तर त्यापुढील वयोगटात ज्यांच्या वयाची बेरीज ९० ते १०० अशा दाम्पत्यांना ४ ते ८ वयोगटातील मुले तर ११० पर्यंतच्या पालकांना त्याहून मोठी मुले दत्तक दिली जातात.

बाळ दत्तक दिल्यानंतर सुरु राहतो पाठपुरावा
दोन वर्षांपर्यंत पाठपुरावा सुरु राहतो. जे दाम्पत्य अगोदर नोंदणी करेल त्याला सुरुवातीला बाळ दत्तक दिले जाते. त्याने पसंत केलेले बाळ कोणत्याही कारणाने दिले गेले नाही तर त्यानंतर पसंत करणाया दाम्पत्याला ते बाळ दत्तक देण्याची प्रक्रिया राबविली जाते. पूर्ण चौकशी करूनच बाळ दिले जाते.