भारतामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये सणासुदीचा कालावधी सुरु होणार असून या पार्श्वभूमीवर अनेक स्मार्टफोन कंपन्यांच्या माध्यमातून उत्तम असे स्मार्टफोन लॉन्च करण्यात येत आहेत.
यामध्ये ग्राहकांच्या गरजा आणि बजेट इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी अनेक उत्कृष्ट फीचर्स असलेले बजेट स्मार्टफोन लॉन्च केलेले आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण मोटोरोला या कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर मोटोरोला 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या बजेट सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार असून त्याचे नाव ‘मोटो G45 5G’ हे आहे. याच स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स आपण या लेखात बघू.
कसा आहे मोटोरोलाचा हा स्मार्टफोन?
1- कसा राहील डिस्प्ले?- मोटो G45 5G स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट 6.5 इंचाचा एलसीडी एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा ब्राईटनेस हा 1600 nits असून त्याचे रिझोल्युशन 1600×720 पिक्सेल असणार आहे व डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास तीन संरक्षण देण्यात आले आहे.
2- कसा राहील कॅमेरा?- मोटोच्या या स्मार्टफोनमध्ये उत्तम फोटोग्राफी करिता ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यामध्ये पन्नास मेगापिक्सलचा प्राथमिक सेंसर आणि आठ मेगापिक्सलचा मॅक्रो फिकस्ड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच उत्तम सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करिता यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.
3- रॅम आणि स्टोरेज– मोटोच्या या स्मार्टफोनमध्ये दोन रॅम आणि दोन स्टोरेज पर्याय देण्यात आले असून यातील पहिला चार जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आणि दुसरा प्रकार हा आठ जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज असे आहेत.
4- बॅटरी आणि चार्जिंग– उत्तम पावर बॅकअपकरिता मोटो G45 5G स्मार्टफोन मध्ये 20W चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
5- कनेक्टिव्हिटी साठीचे पर्याय– मोटो च्या या स्मार्टफोनमध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी साठी 14 5G बँड,4G LTE 3G,2G, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय तसेच जीपीएस आणि चार्जिंग साठी यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे.
किती असणार मोटोच्या या स्मार्टफोनची किंमत?
मोटोरोला च्या माध्यमातून हा स्मार्टफोन ब्रिलियंट ग्रीन, व्हिवा मेजेनटा आणि ब्रिलियंट ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये मिळणार आहे व मीडिया रिपोर्टनुसार बघितले तर या स्मार्टफोनची किंमत 16000 पर्यंत असू शकते. परंतु कंपनीच्या माध्यमातून यावर अजून कुठल्याही प्रकारची पुष्टी करण्यात आलेली नाही.