Parenting Tips: आई-वडिलांच्या ‘या’ चुका मुलांना अभ्यासापासून करतात दूर! सुधारा तुमच्या या चुका, मुलं करायला लागतील अभ्यास

पालक म्हणून स्वतःकडे बघणे व आपल्या काही वागणुकीमुळे मुलांवर काय परिणाम होत आहेत इत्यादी गोष्टींवर लक्ष दिले तर पालकांच्याच काही चुका नकळत मुलांच्या बाबतीत विपरीत  परिणाम करणाऱ्या ठरताना दिसतात व त्यामुळे मुलांची अभ्यासातील आवड कमी होऊ शकते. त्यामुळे पालकांनी देखील काही चुका टाळणे गरजेचे आहे.

Ajay Patil
Published:
parentings tips

Parenting Tips:- प्रत्येक घरामध्ये मुलांच्या बाबतीत पालकांची ओरड असते की अभ्यासाकडे लक्ष देत नाही किंवा नको त्या गोष्टी करत राहतात. तसेच हातात मोबाईल घेऊन त्यावर गेम खेळणे किंवा अभ्यास करायला सांगितले की दुसऱ्याच गोष्टी करत राहणे इत्यादी अनेक प्रकार आपल्याला मुलांच्या बाबतीत दिसून येतात.

प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाने चांगला अभ्यास करावा व उच्च शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी करिअर बनवावे. परंतु बऱ्याचदा अशा प्रकारची अपेक्षा ही मुलांवर ओझे तर बनत नाही ना? याचा विसरच आपल्याला पडतो किंवा याचा विचार देखील आपल्या मनात येत नाही.या गोष्टीचा बराच विपरीत परिणाम मुलांवर पडू शकतो व ते विचलित होऊ शकतात.

त्यामुळे पालक म्हणून स्वतःकडे बघणे व आपल्या काही वागणुकीमुळे मुलांवर काय परिणाम होत आहेत इत्यादी गोष्टींवर लक्ष दिले तर पालकांच्याच काही चुका नकळत मुलांच्या बाबतीत विपरीत  परिणाम करणाऱ्या ठरताना दिसतात व त्यामुळे मुलांची अभ्यासातील आवड कमी होऊ शकते. त्यामुळे पालकांनी देखील काही चुका टाळणे गरजेचे आहे.

 पालकांनी मुलांच्या बाबतीत या चुका टाळाव्यात

1- अभ्यासाचा दबाव टाकू नये  आपल्याला बऱ्याचदा दिसून येते की अनेक घरांमध्ये पालक मुलांवर जास्त अभ्यास कर अशा प्रकारचा दबाव टाकत असतात व अशा प्रकारचा दबाव टाकल्याने त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो व त्यांचे आरोग्य बिघडू शकते. अभ्यास करण्याऐवजी अशामुळे ते अभ्यासातील आवडच गमावून बसतात.

याकरिता मुलांना त्यांची वेळ योग्य प्रकारे मॅनेज कशी करावी याबद्दल शिकवणे खूप गरजेचे आहे. त्यांना थोड्या प्रमाणात मोकळीक द्यावी व त्यांचा अभ्यास कसा मजेदार होऊ शकतो या दृष्टीने विचार करून तशा पद्धतीने त्यांना ट्रीट करावे.अभ्यासाचा दबाव टाकण्याऐवजी मुलांना अभ्यास करण्याला प्रोत्साहित कसे करता येईल याबाबत विचार करणे गरजेचे आहे.

2- तंत्रज्ञान वापरण्यावर बंदी घालणे आज कालची मुले हे आधुनिक तंत्रज्ञानाशी फार मोठ्या प्रमाणावर जोडले गेल्याचे आपण बघतो. हातात स्मार्टफोन घेऊन तो व्यवस्थित ऑपरेट करणारे अनेक लहान वयाची मुले आपण बघितले असतील व यावरून आपल्याला कळून येते की आजकालची लहान मुले तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे आहेत.

परंतु बऱ्याच घरांमध्ये पालक हे मुलांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पूर्णपणे बंदी घालतात. त्यांच्या हातात थोड्या प्रमाणात देखील स्मार्टफोन वगैरे देत नाहीत. परंतु असे न करता तंत्रज्ञानाचा योग्य वापर कशा पद्धतीने करावा याबद्दल जर मुलांना सांगितले तर त्याचा खूप सकारात्मक फायदा होऊ शकतो.

तंत्रज्ञानाचा वापर जर करायचा राहिला तर यामध्ये अनेक शैक्षणिक एप्लीकेशन आणि ॲक्सेसरीज यांचा वापर करून अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करून घेता येतो. चांगल्या गोष्टींसाठी आणि अभ्यासासाठी तंत्रज्ञानाचा किंवा मोबाईलचा वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो  हे सोप्या पद्धतीने जर मुलांना दाखवून दिले तर मुलांचा अभ्यासाच्या बाबतीत सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतो.

3- अभ्यासासाठी नको ते वेळापत्रक बनवणे तसेच पालक मुलांना अभ्यासासाठीचे एक वेळापत्रक त्यांच्या पद्धतीने बनवून देतात व ते इतके कडक पद्धतीचे असते की त्या टाईम टेबलमध्ये जर मुलं पूर्णपणे अडकून बसतात व त्यांच्यावर अतिरिक्त दबाव निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे असं न करता त्यांना अभ्यास करायला त्यांच्या सोयीने मोकळीक देणे गरजेचे आहे व मुलांना वेळेचे नियोजन कशा पद्धतीने करावे व अभ्यासाचे नियोजन कसे करावे हे जर मुलांना समजावले व सोबत त्यांना काही गोष्टींचे स्वातंत्र्य दिले तर त्यांच्यात अभ्यासाच्या बाबतीत आवड निर्माण होऊन अभ्यास करू लागतील.

4- इतर मुलांशी कायम तुलना करणे ही एक खूप गंभीर स्वरूपाची समस्या पालकांच्या बाबतीत दिसून येते. बरेच पालक आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांसोबत करतात व यामुळे मुलांच्या आत्मविश्वासावर खूप मोठा आघात होऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. कारण प्रत्येक मुलांची क्षमता वेगवेगळी असते व त्या क्षमतेनुसारच ते शिकत असतात.

त्यामुळे मुलांची तुलना इतर मुलांशी न करता त्याच्या व्यक्तिगत प्रगतीला प्रोत्साहन कसे मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुमच्या मुलाच्या ज्या क्षमता आहेत त्या ओळखून त्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही कधीही तुमच्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये.

5- मुलांचा अभ्यास घेत असताना तुमच्या अपेक्षेनुसार शिकवू नका बऱ्याचदा पालक जेव्हा मुलांचा अभ्यास घेतात तेव्हा स्वतःची अपेक्षा कशी आहे त्यानुसार शिकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु असं केल्यामुळे मुलांवर प्रचंड तणाव निर्माण होतो व अभ्यासातील आवड ते गमावून बसतात.

त्यामुळे असे न करता आपल्या मुलाची क्षमता कशा प्रकारची आहे हे ओळखून त्याला त्या पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना जर त्यांच्या पद्धतीत किंवा त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या पद्धतीत अभ्यास करायला मदत केली तर त्यांच्या अभ्यासात चांगले मन लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe