Home Care Tips: कुठल्याही रसायनाचा वापर न करता फक्त ‘या’ गोष्टी करा आणि घरातील पाली पळवा! वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Care Tips:- आपल्या घराची आपण प्रत्येक बाबतीत स्वच्छता ठेवत असतो. अगदी घरातच नाही तर घराच्या आजूबाजूचा परिसर तसेच घराच्या बाहेरचा बगीचा देखील आपण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो.

परंतु तरीदेखील घरामध्ये आपल्याला झुरळ, मुंग्या तसेच अनेक बारीक कीटक आणि पालींचा सुळसुळाट दिसून येतो. याव्यतिरिक्त थोडी जरी अडगळं राहिली तरी उंदरांचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला घरात दिसून येतो.

अशा पद्धतीने या पाली किंवा झुरळ तसेच उंदरांचा नायनाट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल युक्त स्प्रेचा वापर करतो किंवा इतर पर्याय अवलंबतो.परंतु तरीदेखील याचा फार मोठा परिणाम आपल्याला दिसून येत नाही.

त्यातल्या त्यात जर आपण पालींचा विचार केला तर घरातील इतर भागांमध्ये पाली आपल्याला भिंतीवर दिसून येतातच परंतु स्वयंपाक घरांमध्ये देखील पालींचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर बऱ्याचदा आपल्याला दिसतो.

तसेच पाल ही विषारी असल्यामुळे जर एखाद्या जेवणाच्या पदार्थांमध्ये पडली तर विषबाधा होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नुकसानदायक असलेल्या या पालीचा नायनाट करायचा असेल तर काही घरगुती उपाय यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. असे उपाय केल्याने पाली कायमच्या घरातून लांब जातात.

 घरातील पाली पळवून लावण्यासाठीचे घरगुती उपाय

1- लसणाचा वापर- लसणाला अतिशय उग्र वास असतो हे आपल्याला माहिती आहे व पालींना अशा पद्धतीचा लसणाचा उग्र वास अजिबात आवडत नाही किंवा सहन होत नाही. त्यामुळे पालींचा बंदोबस्त करण्यासाठी एक कप पाणी घेऊन त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या 

बारीक करून व्यवस्थित मिक्स करून घ्याव्यात. त्यानंतर हे तयार मिश्रण स्प्रे बाटलीमध्ये भरून चांगले हलवून घ्यावे व पाल दिसली त्या ठिकाणी स्प्रे करावे. हे केल्यामुळे काही मिनिटांमध्ये पाल घरातून बाहेर पळून जाते.

2- काळ्या मिरीच्या पाण्याचा उपयोग- हा उपाय करताना एक ग्लास पाणी घ्यावे व त्यामध्ये थोडी काळीमिरी ठेचून त्याची पावडर बनवून ती पाण्यात घालावी व हे पाणी पालींवर शिंपडावे.

या पद्धतीने काळी मिरीचे पाणी जर पालीवर पडले तर त्यांच्या डोळ्यांमध्ये जळजळ होते व ते पळून जातात. या व्यतिरिक्त तुम्ही लाल तिखट किंवा चिली फ्लेक्सचा वापर करू शकतात.

3- कॉफी पावडर- कॉफी पावडर देखील पालींना पळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. याकरिता तुम्ही तंबाखू आणि कॉफी पावडर एकत्र करून त्याचे मिश्रण बनवावे पाण्याच्या मदतीने छोटे छोटे गोळे बनवावेत.

हे गोळे पालीच्या ठिकाणी फिरतात किंवा दिसतात त्या ठिकाणी ठेवून द्यावेत. जर पालीने हा गोळा खाल्ला तर ती त्या ठिकाणी पळून जाते.

4- अंड्याचे टरफले म्हणजेच कवचाचा उपयोग- अंड्याच्या कवचांच्या माध्यमातून जो काही वास येतो तो देखील पालींना सहन होत नाही व त्यामुळे देखील त्या पळून जातात.

याकरिता घरामध्ये ज्या ठिकाणी पाली फिरतात किंवा दिसून येतात त्या ठिकाणी अंड्याचे कवच अडकून ठेवावे. याकरता तुम्ही कॅबिनेट किंवा किचन टॉप चा वापर करू शकतात. यामुळे देखील किचन मधून पाली दूर जातात.