Snoring Causes : तुम्हालाही घोरण्याची सवयी आहे का?; असू शकते गंभीर आजाराचे लक्षण, जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Snoring Causes : काहींना झोपेत घोरण्याची सवयी असते. तुम्हीही घोरण्याच्या समस्येने त्रस्त आहात का? ही एक अतिशय अस्वस्थ परिस्थिती असू शकते. घोरणे ही एक सामान्य समस्या आहे पण अनेकवेळी ते गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते, जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता, तेव्हा-तेव्हा तुम्ही घोरण्यास सुरुवात करता. पण आता प्रश्न असा आहे की, घोरणे हे कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते का?, आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.

आरोग्य तज्ञ म्हणतात की, कोणालाही घोरण्याची समस्या असू शकते, परंतु काही परिस्थितींमुळे तुमचा घोरण्याचा धोका वाढू शकतो. महिलांपेक्षा पुरुषांना घोरणे किंवा स्लीप एपनिया होण्याची शक्यता अधिक असते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय ज्या लोकांचे वजन जास्त आहे किंवा लठ्ठ आहे त्यांनाही ही समस्या होण्याचा धोका असतो. जास्त मद्यपानाची सवय देखील तुमच्या घोरण्याचा धोका वाढवू शकते.

घोरणे आजाराचे लक्षण आहे का?

घोरण्यासाठी अनेक अनेक करणे आहेत, परंतु घोरणे म्हणजे तुम्हाला वैद्यकीय समस्या आहे असे नाही. परंतु कधीकधी हे स्लीप एपनियासह गंभीर झोप विकारांचे लक्षण असू शकते. स्लीप एपनियाच्या समस्येमुळे मोठ्याने घोरणे आणि श्वासोच्छवासात अडथळा येऊ शकतो, ज्यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

स्लीप एपनिया म्हणजे काय ?

स्लीप एपनिया हा एक गंभीर झोप विकार आहे ज्यामध्ये श्वासोच्छवास वारंवार थांबतो. रात्रभर झोपल्यानंतरही तुम्ही जोरात घोरले आणि थकल्यासारखे वाटत असल्यास, तुम्हाला स्लीप एपनिया असू शकतो, त्याचे वेळीच निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे. स्लीप एपनिया ही एक धोकादायक स्थिती आहे ज्याची वेळीच काळजी न घेतल्यास हृद्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.