उन्हाळ्यामध्ये घरातील दूध 24 तास ताजे ठेवायचे असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स! नाही नासणार दूध

Ajay Patil
Published:
fresh milk tips in summer

उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने प्रचंड प्रमाणात तापमानात वाढ होते व त्याचा त्रास प्रत्येक पातळीवर आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने स्वयंपाक घरातील जे काही खाद्यपदार्थ असतात ते या वाढत्या तापमानामध्ये लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच घरात आणलेली फळे किंवा भाजीपाला देखील लवकरात लवकर यामुळे खराब होतो.

तसेच सगळ्यात मोठी समस्या या उन्हाळ्याच्या कालावधीत असते ती म्हणजे दूध खराब होण्याची. त्यालाच आपण आपल्या भाषेत दूध नासणे असे म्हणतो. वाढत्या तापमानाच्या कालावधीत घरातील दूध बऱ्याचदा खराब होते. कित्येकदा आपण अनेक प्रकारच्या युक्त्या याकरिता अवलंबतो.

परंतु तरी देखील दूध खराब होण्याचे प्रमाण वाढते. कधी कधी तर फ्रिजमध्ये देखील दूध खराब झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये याकरिता जर तुम्ही अगदी सोप्या काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर प्रचंड असलेल्या तापमानात देखील 24 तासांपर्यंत दूध अगदी ताजे ठेवू शकतात.

 या टिप्स वापरा आणि उन्हाळ्यात दूध फ्रेश ठेवा

1- बेकिंग सोड्याचा वापर आपण जेव्हा दूध आणतो तेव्हा ते दूध चांगले उकळून नंतर थंड झाल्यावर ठेवतो. परंतु जेव्हा आपण दूध उकळण्यासाठी गॅस किंवा चुल्यावर ठेवतो तेव्हा त्यामध्ये जर चिमूटभर बेकिंग सोडा घातला तर खूप मोठा फायदा होतो. चिमूटभर बेकिंग सोडा घातल्याने दूध खराब होण्याची शक्यता अगदी कमी होते. फक्त बेकिंग सोड्याचा वापर अगदी कमी प्रमाणामध्ये करावा.

2- दूध फ्रिजमध्ये ठेवताना घ्या काळजी जास्त करून दूध हे फ्रीजमध्ये ठेवले जाते. दूध फ्रिजमध्ये ठेवताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.जेव्हा तुम्ही दूध फ्रिजमध्ये ठेवाल तेव्हा काही आम्लयुक्त पदार्थांपासून दूध दूर ठेवणे गरजेचे आहे. जसं की टोमॅटोचा रस, टोमॅटोची चटणी, लिंबू इत्यादी पदार्थांच्या जवळ दूध फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये जर कच्चे मांस किंवा खरबूज असेल तर त्याच्याजवळ दूध ठेवल्याने देखील ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पदार्थांपासून दूध लांब ठेवावे.

3- गरम करण्यासाठी स्वच्छ भांड्याचा वापर आपण जेव्हाही दूध आणल्यानंतर ते गरम करतो तेव्हा दूध गरम करण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करतो ते भांडे खूप स्वच्छ असणे गरजेचे आहे. जर त्या भांड्यामध्ये काही पदार्थांचे डाग असतील तर मात्र दूध खराब होण्याची शक्यता वाढते.

4- दिवसातून तीन ते चार वेळेस दूध गरम करावे तुम्हाला जर उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये असे वाटत असेल तर ते 24 तासाच्या कालावधीमध्ये कमीत कमी चार वेळा गरम करणे गरजेचे आहे. दूध गरम करायला ठेवल्यानंतर त्याला दोन किंवा तीन उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करावा व दूध उकळून झाल्यानंतर लगेच झाकून ठेवू नये. दूध उकळल्यानंतर त्याच्यातील वाफ जेव्हा कमी होईल तेव्हा त्याच्यावर झाकण ठेवावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe