सध्या प्रचंड प्रमाणात उकाडा असल्यामुळे प्रत्येक जण त्रस्त झालेले आहेत. राज्यातील बरेच जिल्ह्यातील तापमान हे 40° डिग्री सेल्सिअसच्यापुढे आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात असलेल्या उकाड्यापासून वाचण्यासाठी घरामध्ये पंखे, कुलर्स, एसी इत्यादी उपकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
परंतु यामध्ये एसी बसवायचा असेल तर तो महागडा असल्यामुळे प्रत्येकालाच बसवणे शक्य नसते. तसेच एसी वापरण्याकरिता वीज मोठ्या प्रमाणावर लागते व वाढीव वीज बिलाचा आर्थिक भुर्दंड आपल्याला सोसावा लागतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी न करता तुम्हाला जर नैसर्गिक रित्या खोली थंड करायची असेल तर अगदी सोप्या पद्धतीने ती करता येते. यासाठी तुम्हाला पैसे देखील लागत नाही व तुम्ही नैसर्गिकरित्या तुमचे घर थंड ठेवू शकतात.
या उपायोजना करा आणि रूम थंड ठेवा
1-DIY एअर कंडिशनर– हा उपाय खूप महत्त्वाचा असून यामध्ये तुम्ही घरातील पंख्यासमोर बर्फाचे भांडे म्हणजेच वाडगा ठेवून स्वतःचे बजेट फ्रेंडली असे एअर कंडिशनर तयार करू शकतात. असं केल्यामुळे खोलीतील वातावरण बऱ्यापैकी थंडगार होण्यामध्ये मदत होते व जाणवणाऱ्या उकाड्यापासून तात्पुरता आराम मिळतो.
2- पंख्यांचा वापर( घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने)- हा देखील पर्याय खूप महत्त्वाचा असून यामध्ये छतावरील जो काही पंखा असतो तो रूम थंड ठेवण्यासाठी फायद्याचा ठरतो. यात छताचा पंखा घड्याळाच्या उलट दिशेने फिरत असल्याची खात्री करावी. जेव्हा पंखा घड्याळाच्या उलट दिशेने फिरेल तेव्हा हवेचा खालचा प्रवाह जो काही असतो तो निर्माण होतो व त्यामुळे खोलीमध्ये थंडावा जाणवतो.
3- हलक्या रंगाच्या पडद्यांचा वापर– घरातील किंवा रूमच्या खिडक्यांपासून सूर्यप्रकाश आणि येणारी उष्णता परावर्तित व्हावी याकरिता खिडक्यांवर हलक्या रंगाचे पडदे वापरावेत. ऐन दुपारी घरामध्ये सूर्यप्रकाश येऊ नये याकरिता ब्लॅक आऊट पडदे किंवा शेड्स बसवण्याचा विचार करा. या छोट्या गोष्टी आहेत परंतु घरात थंड वातावरण निर्माण करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
4-DIY स्टीम कुलर हॅक– यामध्ये तुमच्या घराच्या ज्या खिडकी असतील त्या खिडक्यांवर एखादे शीट किंवा टॉवेल थंड पाण्याने भिजवून तो लटकवावा. त्यामुळे हवा ओलसर टॉवेल किंवा सीट मधून जाते व त्यामधील ओलावा बाष्पीभवन करते व खोलीचे तापमान कमी होते.
5- खिडक्या जवळ रोपांची लागवड– खिडकी जवळ तुम्ही लहान रोपटे किंवा झाड लावले तर थेट सूर्यप्रकाश रोखण्याला व खोलीतील उष्णता कमी करण्यासाठी खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे घरामध्ये रोपांची सावली देखील यावी याकरिता जास्त पाणी असलेली आणि पटकन वाढणाऱ्या रोपांची निवड अशासाठी करावी.
6- रिफ्लेक्टिव्ह कोटींगचे छत– उन्हाळ्यामध्ये घराचे छत प्रचंड प्रमाणात तापल्यामुळे घरात गरम होते. त्यामुळे छत थंड करणे गरजेचे असते व याकरिता छतावर रिफ्लेक्टिव्ह कोटिंग लावणे गरजेचे आहे. त्यामुळे पृष्ठभागापासून सूर्यप्रकाश दूर फेकला जातो व जास्तीची उष्णता शोषली जात नाही. त्यामुळे रूम मधील तापमान सामान्य राहते.
7- सोलर पावर व्हेंटिलेशन– घरामधील गरम हवा बाहेर घालवायचे असेल आणि हवेचा प्रवाह घरामध्ये वाढवायचा असेल तर छतावर सौर ऊर्जेवर चालू शकतील असे वेंटिलेशन पंखे लावावेत. हे स्वयंचलित पंखे असतात आणि सौर ऊर्जेचा वापर करतात. यामुळे घरातील वातावरण देखील थंड होते व विज बिल देखील येत नाही.