व्यक्तीच्या पायाची बोटे सांगतात त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे आहे? वाचा पायाच्या बोटांवरून एखाद्या व्यक्तीची जीवनशैली कशी ओळखाल?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रत्येक व्यक्ती हे वागण्यात, बोलण्यात, विचार करण्यात आणि शारीरिक रचना इत्यादी बाबत वेगवेगळे असतात. तसेच प्रत्येकाचा स्वभाव देखील वेगवेगळा असतो व बोलण्याच्या तऱ्हा देखील वेगवेगळ्या असतात. ज्याप्रमाणे आपल्याला अंकशास्त्र व ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचे भविष्य किंवा एखादे व्यक्ती जीवनामध्ये कसे जगते व इतरांशी कसे वागते? हे सहजतेने सांगता येते.

अगदी याच पद्धतीने आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या शरीराची रचना म्हणजेच व्यक्तीचे डोळे, नाक आणि ओठांचे आकार तसेच पायाची बोटे व बोटांची लांबी व त्यांचा आकार यावरून समोरील व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे आहे हे आपल्याला कळू शकते. त्यामुळे या लेखात आपण व्यक्तीच्या पायाच्या बोटांचा आकार व लांबी पाहून त्याचे व्यक्तिमत्त्व कोणत्या प्रकारचे असते? त्याबद्दलची माहिती घेऊ.

व्यक्तीच्या पायाच्या बोटांवरून ओळखा व्यक्तीचे व्यक्तिमत्व
1- अंगठा- आपण पाहतो की बऱ्याच लोकांच्या अंगठ्याच्या शेजारील जे काही बोट असते ते त्याच्या अंगठ्यापेक्षा मोठे असते. असे लोक हे भाग्याचे धनी म्हणून ओळखले जातात. असे व्यक्ती आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी यशस्वी होतात. जर एखाद्या पुरुषाच्या पायाच्या बोटांची रचना अशा प्रकारचे असेल तर तो आपल्या जीवनसाथी वर खूप प्रेम करतो. तसेच महिलांच्या पायाच्या बोटांची रचना अशा प्रकारची असेल तर त्या नोकरी किंवा व्यवसाय करतात व मोठ्या कष्टाने भरपूर यशस्वी देखील होतात.
2- पायाची बोटे उजवीकडे वाकलेले असणे- आपण पाहतो की काही लोकांची पायाची बोटे उजवीकडे व वाकलेली दिसून येतात. ज्यांच्या पायाच्या बोटांचा आकार या प्रकारचा असतो ते भाग्यवान असतात. त्यांच्या कार्यातून आणि व्यक्तिमत्त्वातून ते संपत्ती आणि मानसिक सन्मान दोन्ही गोष्टी मिळवतात व एवढेच नाही तर ते सामाजिक दृष्ट्या देखील बरेच सक्रिय असतात व समाजात देखील त्यांना खूप मान सन्मान मिळतो.
3- सपाट बोटे- काही लोकांच्या पायाचे बोटे सपाट आणि पसरलेली राहतात. म्हणजेच एकमेकांपासून दूर राहिल्याचे दिसून येते. अशा बोटांची रचना असलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात सुखासाठी खूप संघर्ष करतात परंतु सुख मिळवण्या आधी त्यांना दुःखाला नक्की सामोरे जावे लागते. अशी बोटांची रचना असलेल्या व्यक्तींना संपूर्ण आयुष्यभर कष्ट उपसावे लागतात व ते खूप कठीण आयुष्य जगतात.
4- पायाचे मोठे मधले बोट- काही लोकांच्या पायाचे बोट मोठे असते. अशा लोकांच्या व्यक्तिमत्व अभ्यासू असते व त्यांच्याकडे भरपूर ज्ञान असते. या ज्ञानाचा वापर करून ते भरपूर पैसे मिळवतात. लोकांचे मधले बोट तर्जनी सारखे असते अशा लोकांचे व्यक्तिमत्त्व चांगले असते व भविष्यात ते कुटुंबाला खूप आनंदी ठेवतात.
5- मध्यम ते मोठ्या अनामिका- काही लोकांच्या अनामिकेचा आकार मधल्या बोटा पेक्षा मोठा असतो. अशी रचना असलेल्या लोकांना वेगवेगळ्या आणि नवीन गोष्टी करायला आवडतात. अशी बोटांची रचना असलेल्या स्त्रियांचे पुरुषांशी चांगले संबंध असतात आणि पुरुषांचे देखील स्त्रियांशी चांगले संबंध असतात. अशा लोकांना नेहमीच चैनीचे व विलासी जीवन जगणे आवडते.
6- बोटे समान असणे- काही लोकांना चार समान बोटे असतात व अशा प्रकारचे लोक खूप भाग्यवान असतात व त्यांची जीवनशैली चांगली आणि सर्व सुख सोयींनी युक्त असते. समाजामध्ये या लोकांना खूप ओळख मिळते व त्यांच्या कामामुळे लोकांमध्ये ते खूप प्रसिद्ध होतात. अनेक बाबतीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. परंतु ते अपयशामुळे कधीच मागे हटत नाहीत.
7- करंगळी जाड असणे- काही लोकांच्या पायाची करंगळी जाड असते व अशा लोकांना आयुष्यात एकटेपणा जाणवतो. अशा लोकांना त्यांच्या कुटुंबाचे खूप प्रेम मिळते व ते त्यांच्या दैनंदिन व्यवहारात इतके अडकतात की त्यांना त्यांच्या प्रियजनांना वेळ देता येत नाही.