file photo

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- कोरोना हे जागतिक संकट आहे. आपला जीव वाचवण्यासाठी लाॅकडाउन हाच एकमेव उपाय आहे. १ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन करा. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये.

राजकारण करण्यासाठी पुढे दिवस आहेत, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना श्रीगोंदे येथे लगावला.

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आढावा बैठक झाली.

कुकडीचे आवर्तन २५ एप्रिलला सोडावे या मागणीचे निवेदन मारुती भापकर राजेंद्र म्हस्के यांनी दिले. थोरात म्हणाले, शासन कोरोनाच्या महामारीत आधार मदत करण्याची भूमिका घेत आहे.

नागवडेंनी श्रीगोंद्यात कोरोना सेंटर सुरू केले, ही चांगली बाब आहे. कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांनी होमक्वारंटाइन होण्याऐवजी हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावेत. आॅक्सिजन, रेमडीसिवर इंजेक्शन, इतर औषधे व लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे.

आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, कोरोनात शासनाने सतर्क राहण्याची गरज होती. निधी उपलब्ध करणे आवश्यक होते. तहसीलदार प्रदीप पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम चांगले काम करीत आहे.

आमदार निधीतून दोन रुग्णवाहिका व दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. परिक्रमात कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी आहे.

नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, कोरोना विरुध्दच्या लढाईत शासनाची मदतीची भावना आता कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे.

ज्ञानदीप व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यालयात कोविड हेल्थ सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|