‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेद्वारे एसटीच्या तिजोरीत १४ कोटींची भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांच्या हितासाठी विविध प्रवास योजना आणि उपक्रम राबवण्यात येतात.

यापैकीच एक असणाऱ्या ‘आवडेल तिथे कोठेही प्रवास’ या योजनेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

गतवर्षी या योजनेद्वारे तब्बल १४ कोटी एवढा महसूल मिळाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

‘आवडेल तिथे कोठेही प्रवास’ ही योजना १९८८ पासून सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांशी जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे नाते निर्माण व्हावे, तसेच पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे अशा विविध ठिकाणी कमी खर्चात प्रवास करता यावा,

या उद्देशाने प्रवाशांना हव्या त्या ठिकाणी प्रवास करता यावा, या उद्देशाने आवडेल तिथे कोठेही प्रवास ही योजना सुरू करण्यात आली.

या योजने अंतर्गत १० दिवसांचा पास दिला जात होता. मात्र, २३ एप्रिल २००६ पासून १० दिवसांच्या पासप्रमाणे ४ दिवसांचा पास दिला जात आहे. तर २ मे २०१० पासून १० दिवसांचा पास बंद करून त्या ऐवजी ७ दिवसांचा पास देण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

गतवर्षी १४ कोटींची कमाईया योजनेंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मार्च २०२३ पर्यंत १.०४ लाख पासेसची विक्री झाली,

त्यातून १३९२.८३ लाख इतके उत्पन्न एसटी महामंडळाला मिळाले. तर २०२३-२४ या वर्षात तब्बल १४ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये
□ आंतरराज्य वाहतुकीसाठी महाराष्ट्राच्या एसटी सेवा जेथपर्यंत जातात तेथे पास वैध राहील.
□ या योजनेतील सर्व प्रकारचे पास एसटी महामंडळाच्या शहरी वाहतुकीत वैध राहतील.
□पासधारकास आरक्षण आकार भरून आसन आरक्षित करता येईल.
□ पासधारकास आपल्या सोबत विनामूल्य ३० किलो (मुलांसाठी १५ किलो) वजनाचे सामान नेता येईल.
□उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीस वैध राहील.
□ स्मार्टकार्ड धारकाकडील स्मार्ट कार्ड वाहकाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीनला लावून स्मार्ट कार्डची वैधता तपासता येते व त्यानुसार मशीनमध्ये प्रवाशांची नोंद होऊन प्रवाशास प्रवास करता येतो.

५ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात आलेले दर
सेवा प्रकार ४ दिवसांचा पास ७ दिवसांचा पास
११७० (प्रौढ) २०४० (प्रौढ)
साधी बस ५८५ (मुले) १०२५ (मुले)
शिवशाही १५२० (प्रौढ) ३०३० (प्रौढ) ७६५ (मुले) १५२० (मुले)