पुणे येथील मार्केटयार्ड परिसरात आडत्याकडून अहमदनगच्या शेतकऱ्यास मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील शेतकरी आदिनाथ उर्फ राजेंद्र गायकवाड, यांना पुणे येथील मार्केटयार्ड परिसरात एका अडत्याकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

ही घटना घडून दोन दिवस उलटले तरी आद्यपही संबंधित अडत्यावर कारवाई झालेली नाही, संबंधित अडत्यावर दोन दिवसांत कारवाई करून त्यास अटक करण्यात यावी अन्यथा पुणे मार्केटला शेतकऱ्यांच्या वतीने टाळे ठोकण्याचा इशारा बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष अॅड. सतीश पालवे यांनी दिला आहे.

रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या शेतमालाचा भावसुद्धा शेतकऱ्यांनी विचारायचा नाही का ? असा संतप्त सवाल अॅड. सतीश पालवे यांनी केला आहे. खतांसह कीटकनाशकांचे वाढलेले भाव, दुष्काळी परिस्थिती, लहरी हवामान, अशा अडचणींचा सामना करून शेतकरी फळबागा जगवतो.

नैसर्गिक आपत्तींचा सामना करून पोटच्या लेकराप्रमाणे जपलेला आणि वाढवलेला शेतमाल विक्रीसाठी घेऊन गेल्यावर बाजार समिती शेतकऱ्यांना अपमानित करणार असतील तर शेतकरी पेटून उठल्याशिवय राहणार नाही.

येत्या दोन दिवसांत पाथर्डीच्या शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या अडत्याला अटक करावी अन्यथा शेतकऱ्यांसह पुणे बाजार समितीचे गेट बंद करण्याचा इशारा अॅड. सतीश पालवे यांनी दिला आहे.

आडत्यावर कारवाई झालीच पाहिजे

करंजीसह, भोसे, दगडवाडी, सातवड, तिसगाव, जोडमोहोज, पाथर्डी येथून मोठ्या प्रमाणात संत्रा – मोसंबी व डाळिंब घेऊन शेतकरी पुणे – मुंबई येथे जातात. पुणे मार्केट कमिटीमध्ये करंजी येथील राजेंद्र गायकवाड यांना अडत्याकडून झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करत असून, संबंधित आडत्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. — रफिक शेख, सरपंच, करंजी