Ashti-Nagar Railway: 95 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली ‘ही’ रेल्वे 10 महिन्यात बंद, काय आहे याच्यामागील कारणे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ashti-Nagar Railway:  महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागामध्ये विकासाच्या अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येतात. तसेच पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून देखील मराठवाड्यासाठी अनेक प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जर आपण दळणवळणाच्या सुविधांचा विचार केला तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव तसेच जालना इत्यादी जिल्ह्यांमध्ये  पायाभूत सुविधा उभारणे खूप गरजेचे आहे.

याच दृष्टिकोनातून जर आपण बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असलेली अहमदनगर- बीड-परळी रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी डेमो रेल्वे सेवा तब्बल 95 वर्षाच्या प्रतीक्षा नंतर सुरू करण्यात आली होती. परंतु अवघे दहा महिने ही सेवा सुरू राहिली व नंतर ती आता बंद पडली आहे. अखेर एवढ्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली रेल्वे सेवा बंद का पडली? याच्या मागील कारणांचा शोध घेणे देखील महत्त्वाचे आहे.

 या कारणांमुळे ही डेमु रेल्वे सेवा बंद

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 23 सप्टेंबर 2022 रोजी आष्टी ते अहमदनगर अशी डेमु रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली होती. मात्र अवघ्या दहा महिन्यात ही रेल्वे सेवा बंद पडली आहे. ही सेवा बंद पडण्यामागे या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम सुरू असल्याचे कारण पुढे करण्यात आलेले आहे.

जर आपण अहमदनगर ते आष्टी रेल्वे चा विचार केला तर याची मागणी गेल्या 95 वर्षापासून केली जात होती व एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर ही रेल्वे सुरू करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या रेल्वेला हिरवा सिग्नल दाखवण्यात आला होता. मात्र दहा महिन्याअगोदर सुरू झालेली ही रेल्वे सेवा आता बंद पडली आहे.

या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम  सुरू असण्याच्या कारणा व्यतिरिक्त चालकाची कमतरता तसेच प्रवाशांचा खूप कमी प्रतिसाद इत्यादी कारणांमुळे या रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जवळ जवळ 13 ऑक्टोबर पर्यंत ही रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर पुन्हा रेल्वे फेऱ्या सुरू झाल्या असतानाच गेल्या दोन महिन्यापासून त्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सोलापूर रेल्वे प्रशासनाने देखील दोन्ही फेऱ्या रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे.

 प्रवाशांचा अल्प प्रतिसाद हे प्रमुख कारण

गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर ते आष्टी दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी तरी केली जात होती परंतु दहा महिन्यापूर्वी सुरू झालेली ही या रेल्वे सेवेला हवा तेवढा प्रवाशांचा प्रतिसाद देखील मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. तसेच या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम सुरू असल्यामुळे ऑक्टोबर पर्यंत ही गाडी रद्द करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.