अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : डीएचएफएलशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील बिल्डर-हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेली दीड वर्षे सेंट जॉर्जेस रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असलेल्या भोसले यांना

रुग्णालयात राहण्याची आवश्यकता नसल्याचा अहवाल आयएनएस अश्विनी रुग्णालयाचे ज्येष्ठ सर्जन यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय समितीचा सीलबंद अहवाल तपास यंत्रणेने न्यायालयात सादर केला आहे.

या प्रकरणात अटके त असलेले अविनाश भोसले यांच्यावर १५ ऑक्टोबर २०२२ पासून सेंट जॉर्ज रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. गेले सहा महिने रूग्णालयात दाखल असल्याने यांच्या प्रकृतीबाबत मुंबई महापालिकेच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने दाखल केलेल्या अहवालावर सीबीआयने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

याची दखल घेत विशेष न्यायाधीशांनी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयएनएस अश्विनी रुग्णालयाचे ज्येष्ठ सर्जन यांच्या नेतृत्वाखाली ७ डॉक्टरांची वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने तयार केलेला भोसले यांचा वैद्यकीय अहवाल तपास यंत्रणेने न्यायालयात सादर केला.

दरम्यान, भोसले यांना सीबीआयने मनी लॉण्डरिंगप्रकरणी २६ मे २०२२ रोजी अटक केली होती. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी भोसले यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना २८ जानेवारी २०२३ रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

त्यानंतर ३१ मार्च २०२३ रोजी भोसले यांना कोविड-१९ ची बाधा झाल्याच्या संशयावरून न्यायालयाच्या आदेशाशिवाय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर भोसले हे अनेक दिवस रुग्णालयात दाखल आहेत.

३ महिने रुग्णालयात; सीबीआयने केला दावा

सीबीआयने जे. जे. रुग्णालय किंवा सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या अधिपत्याखाली वैद्यकीय समिती बनवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली. २० नोव्हेंबर २०२३ रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या ४ डॉक्टरांच्या अधिपत्याखाली वैद्यकीय समिती बनवली.

तिने २१ नोव्हेंबर २०२३ रोजी अहवाल सादर केला. त्यात भोसले यांच्या रुग्णालयात राहण्यावर शिक्कामोर्तब केले. या अहवालानंतर भोसले हे तीन महिने रुग्णालयात अॅडमिट आहेत, असा दावा सीबीआयने केला आहे.