बिग ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांना धक्का ! जवळच्या सहकार्याची तब्बल आठ तास ईडीकडून चौकशी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासातील समजले जाणारे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांची आठ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल आठ तास रविंद्र वायकर ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले.(CM Uddhav Thackeray) 

नेमक्या कोणत्या प्रकरणी त्यांनी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आमदार रवींद्र वायकर हे मंत्री आणि मुंबई महानगरपालिकेत तब्बल १५ वर्षे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिलेले आहेत.

सध्या ते मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे मानले जातात.

जोगेश्वरी येथील मातोश्री क्लब, शिवछत्रपती संस्थानासह अनेक समाजिक संस्था आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये संचालक म्हणून काम पाहत आहेत. रविंद्र वायकर हे आज दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले होते.

त्यानंतर तब्बल 8 तास त्यांची ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. 8 तास शिवसेना आमदार रविंद्र वायकर हे ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले.

त्यांना नेमकं कोणत्याप्रकरणी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनुशंगानं ईडीनं रविंद्र वायकर यांना चौकशीसाठी समन्स बजावलं असल्याचं कळतंय.

त्यानुसार रविंद्र वायकर हे चौकशीसाठी हजर झाले होते. आज झालेल्या या चौकशीतून आता नेमकं काय बाबी समोर आल्यात, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.