महाराष्ट्र

Change Driving Rules: ‘या’ व्यक्तीच्या हातात 1 जून नंतर चुकूनही देऊ नका गाडीचे स्टेअरिंग! नाहीतर बसेल 25 हजाराची फोडणी

Published by
Ajay Patil

Change Driving Rules:- रस्त्यावर प्रवास करत असताना त्यासंबंधीचे असलेले वाहतुकीचे नियम पाळणे हे प्रत्येकाला खूप गरजेचे असते व ते स्वतःच्या व इतर व्यक्तींच्या जीवनाचे रक्षणासाठी महत्त्वाचे आहेत. यामुळे वाहतुकीचे अनेक नियम असून ते तंतोतंत पाळणे देखील तितकेच गरजेचे असते.

तसेच यासंबंधी महत्त्वाच्या नियमांमध्ये आता एक जून पासून काही नवीन नियमांची भर पडणार आहे व त्यामुळे नक्कीच  सगळ्या गोष्टींची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. नुकतीच पुण्यामध्ये हिट अँड रन ची घटना घडली हे आपल्याला माहिती आहे व यामध्ये पोर्श ही कार चालवणारा तरुण हा अल्पवयीन होता

व त्याने वेगात गाडी चालवून इंजिनीयर असलेल्या तरुण-तरुणींना चिरडले व त्यानंतर हा अल्पवयीन व्यक्तीने ड्रायव्हिंग केल्याचा मुद्दा पुढे आला. या पार्श्वभूमीवर आता एक जून पासून जे काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे त्यांचे महत्त्व अनन्य साधारण ठरणार आहे.

 एक जून पासून होणार नवीन नियम लागू

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एक जून 2024 पासून सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून ड्रायव्हिंगशी संबंधित नवीन नियम लागू केले जाणार असून नवीन नियमानुसार आता अल्पवयीन व्यक्तीने वेगात वाहन चालवलं तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो.

या नवीन नियमानुसार जर आता एखाद्या व्यक्तीने वेगाने गाडी चालवली तर त्याला एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंतचा दंड देखील भरावा लागू शकतो. एवढेच नाही तर या नवीन नियमानुसार वयाची जी काही मर्यादा आहे त्यापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीने जर वाहन चालवले तर 25 हजार रुपयापर्यंतची दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

जर 18 वर्षाखालील व्यक्ती जर वाहन चालवताना सापडला तर त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. एवढेच नाही तर या दंडा व्यतिरिक्त वाहन मालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द होऊ शकते. कारण नियमानुसार अल्पवयीन व्यक्तीला त्याचे वयाचे 25 वर्षे पूर्ण झाल्यापर्यंत परवाना मिळत नाही.

 किती वयाच्या व्यक्तीला दिला जातो वाहन परवाना?

नियमानुसार बघितले तर वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स हे वयाच्या 18 व्या वर्षी मिळते. तसेच सोळा वर्षाचे वय असताना देखील ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते. परंतु सोळाव्या वर्षी 50 सीसी क्षमतेची मोटरसायकल चालवण्याचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळते व वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तो परवाना अपडेट करता येतो. ड्रायव्हिंग लायसन्स हे मिळाल्यापासून पुढील वीस वर्षांकरिता वैध असते.

Ajay Patil