तुम्हाला माहिती आहे का सातबारा उतारा देखील असू शकतो डुप्लिकेट? फक्त ‘या’ तीनच गोष्टीवर लक्ष ठेवा आणि बनावट सातबारा ओळखा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांच्या अगदी जवळचे आणि जिव्हाळ्याचे कागदपत्र म्हटले म्हणजे सातबारा उतारा होय असे म्हटले तरी वावगे  ठरणार नाही. कारण शेतकरी आणि शेती यांचा जो काही परस्पर संबंध आहे त्याचा आरसाच सातबारा उतारा असतो. तुम्हाला कुठे जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या जमिनी विषयी कर्ज प्रकरणासारखे काम असेल तरीदेखील तुम्हाला सातबारा उतारा हा लागतोच लागतो.

परंतु जर आपण या सातबारा उतारा विषयी विचार केला तर तो देखील डुप्लिकेट अर्थात बनावट असू शकतो. त्यामुळे तुम्हाला देखील सातबारा बनावट कशा पद्धतीने असतो किंवा तो कसा ओळखता येतो? त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला देखील एखादा व्यवहारांमध्ये यामुळे फटका बसू शकतो.

कारण जर आपण सातबारा उताऱ्याच्या बाबतीत पाहिले तर सरकारच्या माध्यमातून अनेक बदल यामध्ये करण्यात आलेले आहे व यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे यामध्ये गावाचा युनिकोड आता नमूद करण्यात येतो. यासह इतर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पाहून तुम्ही सातबारा खरा आहे की बनावट हे आरामात ओळखू शकतात.

 अशा पद्धतीने ओळखा बनावट सातबारा

1- उताऱ्यावर महाभूमीचा लोगो किंवा एलसीडी कोड आहे का?- सरकारने सातबारा उताराच्या बाबतीत जे काही बदल केलेले आहेत त्यानुसार आता सातबारा उताऱ्यावर त्या गावाचा युनिकोड नमूद केला जातो. परंतु जर सातबारा बनावट असेल तर मात्र त्यावर हा युनिकोड नसतो. एवढेच नाही तर सरकारने सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा ई-महाभूमीचा लोगो देखील टाकला आहे. सातबारा उताऱ्यावर ई-महाभूमीचा लोगो नसेल तरी तो सातबारा बनावट आहे असे समजावा.

2- सातबारा उतारावरील क्यूआर कोड पहावा सातबारा उताऱ्यावर आता क्यूआर कोड देखील देण्यात आलेले आहेत. जर तुमच्याकडे असलेल्या उताऱ्यावर जर असा पद्धतीचा क्यूआर कोड नसेल तर तो सातबारा बनावट असल्याचे समजावे. कारण या क्यूआर कोडच्या माध्यमातून तुम्ही तुमचा सातबारा ओरिजनल आहे की नाही हे ओळखू शकतात. त्यासाठी तुम्हाला  क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो.

3- तलाठ्याची सही( डिजिटल)- आपल्याला माहित आहे की सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही असते. ती जर नसेल तर तो सातबारा बनावट समजावा. आता नवीन बदलानुसार सातबारा उताऱ्यावर डिजिटल स्वरूपामध्ये तलाठ्याची सही येते व ती कुठल्याही शासकीय कामाकरिता वैध स्वाक्षरी समजली जाते.

अशा पद्धतीने या तीन गोष्टी जरी तुम्ही पाहिल्या तरी देखील तुम्ही सातबारा बनावट आहे की खरा हे ओळखू शकतात.