उन्हाळ्याच्या सुट्ट्या शांत, थंडगार आणि निवांत वातावरणामध्ये एन्जॉय करायच्या तर ‘या’ हिल स्टेशनला द्या भेट! दडली आहेत महाभारतातील रहस्य

Ajay Patil
Published:
chikhaldara hill station

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून उन्हाळ्यातील शेवटचा म्हणजेच मे महिना सुरू आहे व सगळीकडे प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता असून उकाड्याने नागरिक हैराण झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या वातावरणापासून आणि सुट्टीचा आनंद घेता येईल म्हणून बरेच व्यक्ती हे कुटुंबासोबत एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याकरिता छोटीशी ट्रिप आयोजित करतात.

उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये ट्रीप प्लॅन करताना प्रामुख्याने थंड हवेचे ठिकाणे तसेच हिल स्टेशन, निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर असलेल्या ठिकाणांना पसंती दिली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने या कालावधीत लोणावळा, खंडाळा आणि भारतातील इतर ठिकाणांना भेट दिली जाते.

परंतु या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये असे एक हिल स्टेशन आहे जे शहरापासून दूर आणि अतिशय शांत ठिकाणी असून ते विदर्भात आहे. या ठिकाणी तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला गेल्यावर तुम्ही अद्भुत असे निसर्गसौंदर्याची अनुभूती घेऊ शकतात व हे प्रसिद्ध ठिकाण आहे चिखलदरा हे होय.

 या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चिखलदऱ्याला द्या भेट

या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर तुम्हाला एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी व हिल स्टेशनला भेट द्यायची इच्छा असेल तर तुम्ही विदर्भातील चिखलदरा या ठिकाणाची निवड करू शकतात.

या ठिकाणी असलेले सुंदर तलाव तसेच धार्मिक स्थळे पाहण्याजोगे असून प्राचीन इतिहासासाठी हे ठिकाण ओळखले जाते. विशेष म्हणजे महाभारत काळातील जे अनेक गोष्टी आहेत त्यासाठी देखील हे ठिकाण ओळखले जाते. तुम्ही जर चिखलदऱ्याला गेला तर त्या ठिकाणी तुम्ही अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेली ठिकाणी पाहू शकतात.

1- गुगामल राष्ट्रीय उद्यान समजा तुम्ही या ट्रिपमध्ये थंड हवेच्या ठिकाणासोबतच वन्य जीवन पाहायचे असेल तर तुम्ही चिखलदरा येथील गुगामल राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊ शकतात. यामध्ये तुम्हाला हरीण, सिंह तसेच बिबट्यासारखे अनेक प्राणी व पक्षी पाहायला मिळतात. तुम्हाला निसर्गाची आवड असेल तर तुम्ही या राष्ट्रीय उद्यानाला नक्कीच भेट देऊ शकतात.

2- पंचबोल पॉईंट हे देखील चिखलदऱ्यातील एक पर्यटकांचे आवडते ठिकाण असून हा पॉईंट डोंगराळ दृश्य पाहण्यासाठी प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. या पॉईंटच्या सभोवती कॉफीचे मळे असून या ठिकाणी तुम्ही फिरायला जाऊन निसर्ग सौंदर्य अनुभव शकतात. जर तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी गेले तर निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. दररोजच्या गर्दी व कोलाहालापासून निवांत आणि शांत ठिकाणी तुम्हाला जायचे असेल तर पंचबोल पॉईंट हे उत्तम डेस्टिनेशन आहे.

3- भिमकुंड भीमकुंड हे मध्य प्रदेश राज्यात देखील आहे व महाराष्ट्रातील चिखलदरा येथे देखील आहे. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून डोंगराच्या अगदी मधोमध एक तलाव आहे व त्यालाच भिमकुंड असे  म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाबाबत असे म्हटले जाते की हे ठिकाण ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये शोधले गेले होते व तेव्हापासून ते एक खास पर्यटन स्थळ म्हणून पुढे आले आहे.

 महाभारताशी काय आहे संबंध?

चिखलदरा हे विदर्भामध्ये असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाजवळ आहे. तसेच सातपुडा पर्वताचा एक भाग असून महाभारताशी देखील चिखलदऱ्याचा संबंध आहे असे म्हटले जाते. महाभारताच्या काळामध्ये पांडवांनी वनवासात काही काळ येथे घालवला होता व या कालावधीत जेव्हा पांडव चिखलदऱ्यामध्ये आले होते तेव्हा त्यांनी विराट राजाचे सेवक म्हणून काम केले.

इतकेच नाही तर या ठिकाणी असताना महाभारतातील कीचक नावाच्या पात्राने द्रौपदी सोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता व त्यावर भीमाला राग आला व त्याने किचकचा वध करून या दरीत फेकले होते. याशिवाय महाभारताचे संबंधित अनेक रंजक कसे या ठिकाणी ऐकायला मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe