अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- राज्यातील कोरोना रुग्णवाढ कमी होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं आहे.
हे सगळं असलं तरी गाफील राहू नका, महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मुख्यमंत्री आज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
CM Uddhav Thackeray addressing the state live updates
सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय मराठा समाजाने शांतपणे घेतला, नेते संभाजीराजे यांनी देखील समंजसपणाची भूमिका घेतली, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक.
ज्या वकिलांनी आपल्याला विजय प्राप्त करून दिला त्याच वकिलांसोबत आणखी उत्तम वकील देत आपण ही लढाई लढलो आहोत, तेव्हा आपण लढाई हारलो ही विरोधकांची टीका अनाठायी- मुख्यमंत्री
मराठा आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराशाजनक- मुख्यमंत्री.
१८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती राज्यात करणार- मुख्यमंत्री.
येत्या काही दिवसात महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत- मुख्यमंत्री.