CM Uddhav Balasaheb Thackeray Live : महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- राज्यातील कोरोना रुग्णवाढ कमी होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं आहे.

हे सगळं असलं तरी गाफील राहू नका, महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मुख्यमंत्री आज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

CM Uddhav Thackeray addressing the state live updates

  • आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींचा असल्याचे न्यायालयाचे मत
  • मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा
  • अशोक चव्हाण यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली आहे.
  • छत्रपती संभाजीराजे यांनीही संमजसपणा दाखवला
  • मराठा आरक्षणाची लढाई समर्थपणे सर्वांना एकत्र घेत लढलो.
  • मराठा आरक्षणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक
  • 1800 मेट्रीक टन ऑक्सीजन निर्मिती करणार
  • काही दिवसात ऑक्सीजनबाबत राज्य स्वंयपूर्ण होणार

सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय मराठा समाजाने शांतपणे घेतला, नेते संभाजीराजे यांनी देखील समंजसपणाची भूमिका घेतली, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक.

ज्या वकिलांनी आपल्याला विजय प्राप्त करून दिला त्याच वकिलांसोबत आणखी उत्तम वकील देत आपण ही लढाई लढलो आहोत, तेव्हा आपण लढाई हारलो ही विरोधकांची टीका अनाठायी- मुख्यमंत्री

मराठा आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराशाजनक- मुख्यमंत्री.

१८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती राज्यात करणार- मुख्यमंत्री.

येत्या काही दिवसात महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत- मुख्यमंत्री.

 

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|