Farmer Certificate:- भारत हा शेतीप्रधान देश आहे व भारताचे अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. भारतातील ग्रामीण भागाचा विचार केला तर बहुसंख्य लोकसंख्या ही शेती व शेती आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून असल्यामुळे शेती हा आर्थिक विकासाचा कणा असल्याचे म्हटले जाते.
शेतीसंबंधी पाहिले तर आपण सातबारा तसेच आठ अ चा उतारा इत्यादी सारख्या अनेक महत्त्वाची कागदपत्रे असतात. या कागदपत्रांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याची जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध होत असतो. परंतु आपण शेतकरी आहात याकरिता महत्त्वाचा असलेला शेतकरी दाखला देखील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे.
परंतु हा शेतकरी दाखला किंवा शेतकरी प्रमाणपत्र नेमके कुठे काढावे लागते किंवा त्याची प्रोसेस नेमकी कशी असते इत्यादी बद्दल बऱ्याच जणांना अजून देखील माहिती नसेल. यासंबंधीची महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
कुठे मिळेल शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र?
याकरिता जर आपण पाहिले तर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे व या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळू शकते. तसेच दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही सेतू कार्यालयामध्ये जाऊन देखील ते काढू शकतात.
यातील तिसरा मार्ग म्हणजे महाराष्ट्र सरकारची जी काही आपले सरकार म्हणून एक वेबसाईट आहे त्यावर देखील तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळवता येते. https://aaplesarkar.mahaonline.gov.in ही सरकारचे अधिकृत वेबसाईट आहे.
याकरिता तुम्हाला कुठली कागदपत्रे लागतील?
शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र काढण्याकरिता तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच मतदार कार्ड, रोजगार हमी योजनेची ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि सरकारकडून काही ओळखपत्र असतात त्यापैकी एक ओळखपत्र आवश्यक असते. तसेच तुमच्या जमिनीचा सातबारा व आठ अ चा उतारा देखील आवश्यक असतो.
तसेच हे प्रमाणपत्र मिळवण्याकरिता तुम्हाला स्वयंघोषणा प्रमाणपत्र भरणे गरजेचे असते. जेव्हा तुम्ही शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करता तेव्हा त्या अर्जासोबत हे स्वयंघोषित प्रमाणपत्र भरणे गरजेचे असते.
आपले सरकार पोर्टल वरून कसा करावा अर्ज?
आपले सरकार हे सरकारची अधिकृत वेबसाईट असून त्यावर जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून लॉगिन करून घेणे महत्वाचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर विविध विभाग बघायला मिळतात. त्यामधून तुम्हाला महसूल विभागाची निवड करायचे असते.
समोर शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय तुम्हाला निवडावा लागतो. आपल्या निवडल्यानंतर तुमच्यासमोर कागदपत्रांची यादी दिसते व ही या यादीनुसार संपूर्ण कागदपत्रे तुम्ही वाचून घ्यावी व सांगितलेली कागदपत्रे आपले सरकार पोर्टल वर अपलोड करावे. त्याशिवाय तुम्हाला सही व फोटो सुद्धा अपलोड करणे गरजेचे असते.
हे प्रक्रिया झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा. याकरिता जे काही तुम्हाला शुल्क भरावे लागते ते देखील तुम्हाला या पोर्टलवर ऑनलाईन भरायचे असते यासाठी मिळालेली पावती तुमच्याकडे सेव्ह करून ठेवणे गरजेचे असते. अशाप्रकारे तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीत तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळते.
जास्तीत जास्त पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो. पंधरा दिवस झाल्यानंतर जर शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळालेले नाही तर तुम्ही संबंधित आपले सरकार पोर्टलच्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून तिथे अपिल अर्ज सुद्धा करू शकतात.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी साध्या पद्धतीने शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळवू शकतात.