5 वर्ष म्हणजे सरासरी 1825 दिवस होय …तर आज अहमदनगर Live24 सुरु करून इतके दिवस झालेत
वयाच्या 18 व्या वर्षी पत्रकारितेतील ‘प’ ही माहित नसताना एक न्यूजपोर्टल आणि ते ही जिल्ह्याचे बनविले जे आज visits, likes, followers च्या आणि जिल्ह्यातील सर्वच मिडीया हाउस स्पर्धेत नंबर 1 वरच विराजमान आहे
मागे वळून पाहिलं तर रिस्क घेण किती महत्वाच ठरलं हे जाणवत 2015 साली हे पोर्टल चालवताना डोळ्यासमोर फक्त एक पोर्टल सुरु करणे हेच टार्गेट होत, पैसे कमाविण्यासाठी मी दुसर्यांना वेबसाईट बनवून द्यायचो राजकीय व्यक्तींचे सोशल मिडीया साभाळून पोर्टलकडे लक्ष द्यायचो..
समोर एक रुपयाची कमाई न दिसतानाही मी जवळपास हे पोर्टल तीन वर्ष चालविले त्यानंतर जाहिराती सुरु झाल्या…. गेल्या पाच वर्षांत काय केले असेल तर ते फक्त स्वताला सिद्ध केलय आणि स्पर्धेत टिकून रहात अनेक नव नवीन संकल्पनांना जन्म देत आर्थिक दृष्ट्या स्वताला सक्षम बनवलेय
आज पाच वर्षानंतर मागे वळून पहाताना स्वताला सिद्ध केल्याचा आनंद आहे आजही आठवत 2010 साली मी एका कंपनीत माझा दिवसाचा रोज होता 140 रुपये आणि मला महिन्याला मिळायचे 4200 रुपये आज दिवसाला त्या काळच्या महिन्याच्या पगारापेक्षा दुप्पट कमावतोय ! आणि अर्थात यापुढील काळातही हे वाढतच राहिल …
मी ज्या परिवारातून येतो ते माझ गावातील शेलार कुटुंब गरीब आणि मोलमजुरी – शेतकरी इतकीच ओळख होती माझ्या संपूर्ण परिवारात बारावी पास झालेला मी पहिला व्यक्ती होतो यावरून तुम्हाला अंदाज येईल असो.. तर 2015 साली गाव (देवदैठण,श्रीगोंदा) ते नगरमधील मेसवरच जेवण ते एका Laptop पासून अहमदनगर live24 ची सुरवात झाली घरपरिवारापासून दूर राहून (हे सर्वच करतात त्यामुळे त्यात विशेष काही नाही)
अहमदनगर Live हे आयुष्यातल माझ पहिल स्टार्टअप…ज्याची सुरवात आज पाच वर्षांपूर्वी झाली….अनेक लोकांसाठी मी म्हणजे तेजस शेलार आणि अहमदनगर Live ही ओळख असावी आज हे जिल्ह्यातील नंबर 1 न्यूज पोर्टल आहे गुगल असो फेसबुक असो वा dailyhunt अहमदनगर जिल्ह्यात हे नेहमीच Top वर राहिलेय
अलीकडे समाजाचा पत्रकार – संपादक याच्याकडे पहाण्याचा दुष्टीकोण वाईट असतो,अनकेदा मिडीया म्हणजे पैसे असा अनेकांचा गैरसमज असतो पण इथली वास्तविकता खूप कमी लोकांना माहीत असते, गेल्या पाच वर्षांत हे पोर्टल चालवताना मी आजवर blackmail , खोट्या बातम्या वा वैयक्तिक आणि टीकात्मक बातम्या ह्या कोणत्याच प्रकारात पडलो नाही,
माझे काम सुरु ठेवले कोणत्याही प्रकारे पैश्याला भुललो नाही कि त्याच्या मागेही फारसा लागलो नाही शांत राहून काम सुरु आहे कोणालाही विरोध नाही वा लालचेपोटी सहकार्य नाही, राजकारण वा दोन नंबर काही नाही फक्त ब्रेकिंग बातम्या देणे हे एकच माझे ध्येय होते आणि यापुढेही तेच राहील
हार्डवर्क आणि फोकस हे दोन माझ्या आजवरच्या प्रवासातील दोन महत्वाचे घटक आहेत,साधारण दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत मी Live असतो नाही म्हंटल तरी दररोज दहा ते बारा तास एका जागेवर बसून काम करण अवघड असते गेल्या पाच वर्षांत साधारणपणे दहा लग्नही मी अटेंड केलेली नाहियेत, कॉलेजला अडमिशन घेवूनही दोन वर्षांपासून कॉलेजच तोंड पाहिले नाही
आयसोलेशन हा शब्द अनेकांच्या आयुष्यात कोरोना व्हायरस आल्यापासून आला असेल पण मी नाही म्हटल तरी माझे हे पाच वर्षे आयसोलेशन मध्येच घातले म्हणाव लागेल कारण गेल्या पाच वर्षांत मी माझ काम सोडून खूप कमी गोष्टी केल्यात सुरवातीला परिवार , मित्र , समाज यांच्यापासून जास्त कनेक्टेड न राहता मी फुलटाईम माझ्या कामाकडेच लक्ष दिले अहमदनगर Live24 वगळता खूप कमी गोष्टी माझ्या आयुष्यात होत्या
एकेकाळी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात active होतो वैयक्तिक पणेमाझे सोशल मिडीया प्रोफाईल वरून बोलणे आणि अपडेट्स देणे दोन वर्षापूर्वी मी बंद केले आज त्याचाच मला फायदा होतोय , होय अलीकडे मी शांत झालोय,प्रसिद्धी नको वाटते जे काम तुम्ही एकांतात करू शकता ते जबरदस्त असत यावर विश्वास बसू लागलाय आणी ते फायद्याचे ही आहे..
.एकीकडे या पाच वर्षांत माझ रहाणीमान मला साधेच ठेवायला आवडल ,मी बदललो नाही, भपकेबाजी पणा, खोटेपणा मी कधी ठेवला नाही मला तो आवडत नाही… जे आहे ते रीअल जस आहे तस सोने असो वा कोळसा फक्त इतरांपेक्षा वेगळा आणि उठून दिसला पाहिजे तेही कामातून ना कि मेकअप मधून….
सध्या वेब मिडीया व्यवसायातही रिस्क आहे स्पर्धा आहे पण माझे वाचक , माझ्या टीम कडून सातत्याने मिळणारे अपडेट्स हीच माझ्या पोर्टलची लोकप्रियता असावी , माझी ओळख ही माझे वाचक असावी, टेक्नोलॉजी चा पुरेपूर वापर मी आजवर करत आलोय आणी यामुळेच जिल्ह्यातील नंबर 1 वर माझे पोर्टल असावे…
एकंदरीत आयुष्य परफेक्ट आहे आज दररोज दीड ते दोन लाख वाचक बातम्या वाचतात, जिल्ह्यातील कोणतीही ब्रेकिंग बातमी असो ती अहमदनगर live24 वर असतेच,दररोज सरासरी 35 बातम्या होतात अनेकदा टीकाही होते. मी क्राईम मर्डर, बलात्कार, राजकारण आणि पेज थ्री व लाइफस्टाइल कंटेंट वर फोकस करतो ,पण जे लोकांना हव तेच पुरवितो
अनेक लोक आहेत ज्यांच मला पाठबळ मिळाल अनेक असे आहेत कि ज्यांच्या मुळे अनेक काही शिकायला मिळाल अलीकडे एक चांगली टीम ही तयार केलीय काही पोर्टल्स वाढविले आहेत पण हे सर्व चालू असतानाच व्यवसायाचा विस्तारही केल्या अहमदनगर live24 प्रमाणेच काही पोर्टल्स सध्या सुरु आहेत (काही जगजाहीर आहेत आणी काहीच्या मागे माझी इव्हेंस्टमेंट)
राज्य आणि देशपातळीवरील काही पोर्टल्स आणि (मराठी आणि हिंदी) त्याचबरोबर माझा आवडता विषय लाइफस्टाइल वर काही प्रोजेक्ट्स सुरु आहेत येणाऱ्या नव्या वर्षांत एक नवा तेजस तुम्हाला पहायला मिळेल जो अहमदनगर सोबतच राज्यात आणि काहीप्रमाणात देशातही ब्रेकिंग न्यूज देण्याचे काम करत असेल !
हे सार उभारण्यात अनेकांचा हात आहे मला अनेकांनी सहकार्य केल, मार्गदर्शन केल त्या सर्वांचा मी वैयक्तिकपणे आभारी आहे माझ्या आयुष्यातील चुका याच माझ्या मार्गदर्शक आहेत काही चुकीचे निर्णय आणी चुकीचे माणसे भलेही व्यवसायात असोत वा वैयक्तिक आयुष्यात महाग पडतात अशीच निर्णय आणि माणसे मलाही महाग पडले पण आज या सर्वातून बाहेर पडून आनंदी आहे.
अजूनही खूप काही करायचंय ….
तुमचे सर्वांचे सहकार्य होते
असेल असावे इतकच !
ह्या पाच वर्षांत कोणी दुखावले असेत तर माफ करा ….
तुमचाच
तेजस बाळासाहेब शेलार
9665762303 / 9673867375