Ganeshotsav 2024 Special: आराध्य दैवत गणेशाच्या महाराष्ट्रातील ‘या’ साडेतीन पिठांना द्या भेट आणि बापाचे घ्या दर्शन! वाचा कोणती आहेत ही पीठे?

गणेश उत्सवाच्या निमित्ताने जर दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील अष्टविनायकांसोबतच महाराष्ट्रात असलेल्या बाप्पांच्या साडेतीन पीठ यांना भेट देऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण श्री गणेशाचे महाराष्ट्रातील साडेतीन पीठे कोणती आहेत याबद्दलची माहिती घेऊ.

Ajay Patil
Published:
rajura ganpati temple

Ganeshotsav 2024 Special:- महाराष्ट्रातच नाही तर अखंड भारतामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर आणि खूप धामधुमीत साजरा केला जात असून सगळीकडे अतिशय भक्तीमय आणि मंगलमय वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. गणेशोत्सवाचे महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहिती असून अगदी  भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या लढ्यात देखील गणेशोत्सवाचे महत्त्व तितके अनन्य साधारण असे राहिलेले आहे.

तसेच श्री गणेश यांना आराध्य दैवत मानले जाते व कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याआधी गणेशाचे पूजन केले जाते. अशा या महत्त्वाच्या असलेल्या आराध्य दैवताचे तुम्हाला या गणेश उत्सवाच्या निमित्ताने जर दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील अष्टविनायकांसोबतच महाराष्ट्रात असलेल्या बाप्पांच्या साडेतीन पीठ यांना भेट देऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण श्री गणेशाचे महाराष्ट्रातील साडेतीन पीठे कोणती आहेत याबद्दलची माहिती घेऊ.

 या ठिकाणी आहेत गणपती बाप्पांची महाराष्ट्रातील साडेतीन पीठे

1- पहिले पीठ आहे श्रीक्षेत्र मोरगाव भुस्वानंदपूर म्हणजेच आजचे प्रचलित मोरगाव गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ म्हणून ओळखले जाते. श्री क्षेत्र मोरगावाचा आकार हा मोरासारखा असून ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी या ठिकाणी ओंकार स्वरूपी गणेशाची स्थापना केली व उन्नत सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमला सूरा चाही वध श्री गणेशानी या ठिकाणी केला आहे.

या ठिकाणी कमलासुराचे शीर जमिनीमध्ये गाडून त्याच्यावर श्री गणेश हे आरुढ होऊन बसले आहेत. आपण या ठिकाणी या प्रसंगाचे प्रतीक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी असलेल्या गणेशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी गणेशा पुढे नंदी आहे.

2- दुसरे पीठ आहे श्रीक्षेत्र राजुर पूर्वी या राजूरला राजापूर म्हणून ओळखले जायचे. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. कृष्णाच्या मुखातून जेव्हा अर्जुनाने गीता ऐकली अगदी त्याचप्रमाणे साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्यराजाला गणेश गीता सांगितली.

गणपत्य संप्रदायामध्ये या ठिकाणाला खूप महत्त्व असून राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजुरचा महागणपती म्हणतात. हे ठिकाण मराठवाड्यामध्ये असून जालना शहरापासून हा गणपती 22 किलोमीटर अंतरावर आहे. राजुर गावानजीक असलेल्या एका टेकडीवर हे मंदिर असून या ठिकाणी वरण्य राजाची मूर्ती देखील आहे.

हा गणपती नवसाचा समईला पावतो आणि या ठिकाणच्या मूर्ती पुढे अंदाजे सव्वाशे समया रोज तेवत ठेवल्या जातात. या ठिकाणी लावलेल्या शेकडो ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात ही मूर्ती फारच विलोभनीय अशी दिसते. गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे खूप भाग्याचे मानले जाते.

3- तिसरे पीठ आहे पद्मालय पद्मालय हे ठिकाण जळगाव जिल्ह्यात असून या क्षेत्री दोन गणेश मूर्ती असून दत्तभक्त असलेले सहस्र अर्जुनाने स्थापन केलेले प्रवाळ गणेश आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेले धरणेश्वर गणेश अशा दोन गणेश मूर्ती या ठिकाणी आहेत.

यापैकी एक मूर्ती उजव्या सोंडेची तर दुसरी डाव्या सोडीची असून जळगाव जिल्ह्यात असलेल्या एरंडोल या शहरापासून आठ किलोमीटरवर हे पद्मालय आहे. हे एक डोंगरावर असून या ठिकाणी असलेल्या तलावामध्ये अनेक प्रकारची कमळाची फुले फुलतात म्हणून या क्षेत्राला पद्मालय असे संबोधले जाते.

4- अर्ध पीठ आहे श्रीक्षेत्र चिंचवड महान गणपती साधू मोरया गोसावी यांच्यामुळे या स्थानाला खूप महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. मोरया गोसावी मोरगाव येथे करा नदीमध्ये जेव्हा स्नान करत होते तेव्हा गणेश हे तांदळा स्वरूपात आले.

तो घेऊन ते मोरगावी वारी करत असत. सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठा शके 1383 रोजी जिवंत समाधी घेतली होती. चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe