Gautami Patil : ‘गौतमीला 3 गाण्यासाठी काही लाख मोजतात, आणि तीनच गाणी ऐकली की 300 पोरांच्या चड्ड्या फाटल्या’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gautami Patil : सध्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत आहे. तसेच गौतमी पाटील सर्वाधिक मानधन घेते. एका कार्यक्रमासाठी ती तब्बल तीन लाखाच्या पुढे रक्कम घेते. तरी देखील अनेकजण खर्च करून तिचा कार्यक्रम ठेवतातच. यामुळे तिची नेहेमी चर्चा होते.

असे असले तरी तिच्या कार्यक्रमात होणार गोंधळ, तिचे हावभाव, तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जातो. असे असताना निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांनीही गौतमीवर टीका केली आहे. ते म्हणाले, आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. त्याचं काय खरं आहे, असे म्हटले जाते.

असे असताना मात्र गौतमी हिने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साध संरक्षण देखील दिले जात नाही. असे इंदुरीकर महाराज म्हणाले. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

तिकडे तीन लाखाला तीनच गाणी ऐकतात आणि 300 पोरांच्या चडड्या फाटतात. 200 पोरांचे गुडघे फुटतात. मारामाऱ्या झाल्या. शेतकरी तुम्ही बोलयाचे नाही. आम्ही रस्त्यावर कीर्तन करतो. आमचं जीवन वाऱ्यावर. आम्हाला विमा नाही. मी गेल्यावर कळेल तुम्हाला हा काय बोलत होता, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.

दरम्यान, आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील महोत्सवात काल इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. सध्या सतत गौतमीवर टीकाही होत असते. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जातो. तिचे नृत्य अश्लील असल्याचे म्हटले जाते. याबद्दल गौतमीने माफीही मागितली होती.