Gautami Patil : ‘मला जे चांगलं म्हणतात त्यांना धन्यवाद, जे चांगले म्हणत नाही त्यांना बाय बाय’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. असे असताना गौतमी पाटील हिचा जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी गौतमी पाटीलने तिला चांगले म्हणणारे आणि चांगले न म्हणणारे अशा दोन्ही वर्गांवर भाष्य करत टोलेबाजी केली. या कार्यक्रमात गौतमीने ‘पाटलांचा बैलगाडा’ आणि ‘कच, कच, कापताना कांदा’ या दोन गाण्यांवर डान्स केले. यावेळी मोठी गर्दी झाली होती.

यावेळी ती म्हणाली, ज्याचे त्याचे विचार असतात दादा. आज काही लोक एक बोलत आहेत, तर काही लोक दुसरंच काही तरी बोलत आहेत. मला जे चांगलं म्हणतात त्यांना मी धन्यवाद करते आणि जे मला चांगल म्हणत नाही त्यांना बाय बाय, असे म्हणत तिने टोलेबाजी केली आहे.

हा माझा हा पहिलाच गौरव पुरस्कार आहे. मी पुरस्कार देणाऱ्या ‘आपली सखी, आपला आवाज’ मंचाचे आभार मानते. त्यांनी मला इथं बोलावले आणि इतका मानसन्मान दिला. आज जागतिक महिला दिन आहे. या दिवशी मला बोलावून पुरस्कार दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते, असेही ती म्हणाली.

आज महिलाही माझ्या नृत्याचा आनंद घेत होत्या. मी एकटीच नृत्य करत होती असे नाही. त्यामुळे मला खूप खूप छान वाटत आहे, अशी भावना गौतमी पाटीलने व्यक्त केली. यावेळी तिचे अनेक चाहते उपस्थित होते.