खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देता आल्याचा आनंद ! आकारी पडीत जमीनीबाबत लवकरच निर्णय – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीकरीता झालेल्या संघर्षास मिळालेले यश खूप महत्वपूर्ण आहे. अनेक कायदेशीर लढाया करून जमीनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या.

खंडकरी शेतकऱ्यांना महायुती सरकारमुळेच न्याय मिळाला. आता आकारी पडीत जमीनीबाबतचा निर्णयही लवकर करू, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

तालुक्यातील उक्कलगाव येथे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीचा निर्णय केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांचा सत्कार आणि पेढेतुला करण्यात आली. तालुक्यातील ४५२ शेतकऱ्यांना ४ हजार हेक्टर जमीन महायुती सरकारमुळे मिळाली असून यामध्ये ९९ शेतकरी उक्कलगावचे असल्याची माहिती त्यांनी दिली,

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीच्या प्रश्नाचे मोठे राजकारण झाले. पण माधवराव गायकवाड आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्णायक संघर्ष केला. या संघर्षाचे यश आज आपल्या सर्वाना पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर खंडकरी शेतकऱ्यांचा जमीनी परत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यापुर्वी फक्त आश्वासन दिली गेली. ज्यांचा काही संबंध नव्हता ते या प्रश्नावर केवळ बोलत होते. युती सरकारने मात्र सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हा ऐतिहासिक निर्णय करण्याचे भाग्य मला मिळाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे खंडकरी शेतकऱ्यांना दिलेल्या जमीनी भोगवटा वर्ग १ करताना कोणताही मोबदला न घेण्याचा निर्णय सुध्दा महायुती सरकारने केला. राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे.

प्रत्येक निर्णयामागे लोकहिताची भावना आहे. खंडकरी शेतकऱ्यांप्रमाणेच आकारी पडीत जमीनीबाबतचा निर्णयही लवकर घेणार असून याबाबतही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरू झाले. याचाही दिलासा शेतकऱ्यांना देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.