उद्योजक व्हायचे आहे तर मराठा/ कुणबी तरुणांसाठी आहे मोठी संधी! ताबडतोब ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Ajay Patil
Published:
saarthi scheme

नोकऱ्यांची कमी असलेली उपलब्धता आणि त्यामानाने दरवर्षी सुशिक्षित बेरोजगारांमध्ये पडणारी भर हा सरकार समोर एक मोठा गंभीर प्रश्न असून बेरोजगारीच्या समस्यावर मात करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न देखील केले जात आहे. तरुण-तरुणींना व्यवसाय/ उद्योग उभारणीला प्रोत्साहन मिळावे म्हणून आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक योजनांची आखणी करण्यात आलेली आहे

व अशा योजनांमधून अनुदान आणि कर्ज स्वरूपात उद्योग/ व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाजातील मराठा/ कुणबी समाजातील युवकांकरिता एक उद्योजक होण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या नवकल्पनेला प्रत्यक्ष स्टार्टअपमध्ये रूपांतरित करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात.

 काय आहेसरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रम’?

मराठा/ कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याची एक मोठी संधी चालून आली असून सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही नवनवीन कल्पना असतील त्या कल्पनांना स्टार्टअप मध्ये रूपांतरित करण्याकरिता आर्थिक मदत केली जाणार आहे.

राज्यात जे काही विविध इनक्युबेशन केंद्रे आहेत त्यांच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व आवश्यक असलेल्या सुविधा देखील देण्यात येणार आहेत. ही योजना छत्रपती शाहू महाराज संशोधन,  प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथीमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 या तारखेपर्यंत करता येईल अर्ज

ज्या तरुणांना यासाठी अर्ज करायचा असेल ते 30 एप्रिल 2024 पर्यंत करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी नोंदणी करावी व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठा किंवा कुणबी गटातील नवं उद्योजकांची निवड एका वर्षासाठी करण्यात येते.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता

1- विद्यार्थी हा किमान पदवीधर असावा.

2- विद्यार्थ्याकडे स्वतःची व्यवसाय कल्पना असावी.

3- एका वर्षाच्या कालावधीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांनी त्या कल्पनेच्या रूपांतर स्केलेबल टेक्नॉलॉजी बिजनेस स्टार्टअप मध्ये करणे गरजेचे आहे.

4- ज्या कालावधीमध्ये अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाईल त्या कालावधीत विद्यार्थ्यांनी च्या उद्योजकीय आकांक्षा करिता पूर्ण वेळ पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

 उपलब्ध इनक्युबॅशन केंद्र आणि जागा

1- एसपीपीयु रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे- उपलब्ध जागा 10

2- शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस कोल्हापूर- उपलब्ध जागा 10

3- मराठवाडा एक्सेलरेटर फॉर ग्रोथ अँड इनक्युबेशन कौन्सिल, छत्रपती संभाजीनगर- उपलब्ध जागा 10

4- उद्यम सोलापूर विद्यापीठ इनक्युबेशन सेंटर, सोलापूर- उपलब्ध जागा 10

5- जी.एच रायसोनी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर फाउंडेशन, नागपूर- उपलब्ध जागा दहा

6- नेत्ररित फाउंडेशन, सांगली- उपलब्ध जागा 10

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe