गुडन्यूज !नवीन वर्षात लाखोंची नोकरभरती

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-या वर्षी राज्यसरकारच्या विविध विभागात किमान एक लाख पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत त्यांनी थोडक्यात त्यांनी सांगितले की, राज्यातील नोकर भरतीबाबत आज मंत्रिमंडळात चर्चा झाली.

याशिवाय मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, नोकरभरतीबाबत सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे.

कारण काही दिवसांपूर्व काँग्रेस नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे नोकर भरतीची प्रक्रिया सुरु करण्याची विनंती केली होती.

“नव्या वर्षापासून शासकीय सेवेत रिक्त असणाऱ्या 1 लाखांपेक्षा जास्त पदांसाठी तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरतीप्रक्रिया सुरु करावी”,

अशी विनंती पत्राद्वारे केली होती. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक होते. त्यामुळे याबाबत लवकर घोषणा होण्याची शक्यता आहे. अस्लम शेख म्हणाले की,

“नोकर भरती आणि त्या संबंधित विषयांवर आज बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याने त्यावर नीट मार्ग काढला जाईल”, असे अस्लम शेख म्हणाले.