खुशखबर! एसबीआय देत आहे अधिकारी बनण्याची संधी; असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- आपण नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्याचांगलीच फायद्याची आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने रिक्त जागा बहराव्यचे ठरवले आहे.

बँकेने 92 स्पेशलिस्ट केडर अधिकारी व इतर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक अर्जदार 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. चला संपूर्ण तपशील जाणून घेऊया. –

* 1 उमेदवार केवळ 1 पदासाठीच अर्ज करू शकतो:- लक्षात ठेवा की 1 उमेदवार केवळ 1 पदासाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी आपण https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

सर्वसाधारण / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल, तर अनुसूचित जाती / जमाती / पीएच उमेदवारांना कोणतीही फी नाही. परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ऑफलाइन फी भरणा मोडद्वारे भरले जावे.

* महत्त्वाच्या तारखा :- अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख देखील 8 ऑक्टोबर 2020 आहे.

* कोणकोणत्या फील्डमध्ये आहे व्हॅकन्सी –

  • – उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) – 11 पदे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता- बी.टेक / एमटेक मध्ये संगणक विज्ञान / आयटी / डेटा विज्ञान / मशीन लर्निंग आणि एआय मध्ये बी.टेक / एम टेक आणि 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • – व्यवस्थापक (डेटा वैज्ञानिक) – 11 पदे. शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता वरील प्रमाणे, परंतु अनुभव 5 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • – उपव्यवस्थापक (सिस्टम अधिकारी) साठी 5 पदे रिक्त आहेत. शैक्षणिक पात्रता- उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) प्रमाणेच आहे.
  • – डेटा संरक्षण अधिकारी – 01 पदे. 15 वर्षांच्या अनुभवासह बैचलर डिग्री.
  • – रिस्क स्पेशियलिस्ट – 19 पदे

* या पदांवरही संधी :- पोर्टफोलियो मॅनेजमेंट स्पेशलिस्ट स्केल II – 03 पोस्ट, मॅनेजर (रिटेल प्रोडक्ट) – 05 पद, डिप्टी मॅनेजर (सिक्योरिटी) – 28 पद, असिसमेंट जनरल मॅनेजर – 01 पद, वरिष्ठ सलाहकार विश्लेषक – 01 पद, डेटा ट्रांसलेटर – 01 पद आणि डेटा ट्रेनर – 01 पद

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment