ग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप म्हणते आम्हीच बाजी मारली !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्­ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, राज्­यात सर्वात जास्­त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

तर भाजपा प्रदेश प्रवक्­ते केशव उपाध्ये यांनी राज्­यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतींपैकी ५ हजार ७८१ ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकल्­याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामपंचायत निवडणुकांत अव्वल ठरली असून, त्­याखालोखाल भाजपा २ हजार ९४२, शिवसेना २ हजार ४०६ तर काँग्रेस चौथ्­या स्­थानी म्­हणजे १ हजार ९३८ जागांवर यशस्­वी ठरल्­याचे जयंत पाटील म्­हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळातील पक्ष असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळे पक्ष पुढे आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा दावा आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपा महाराष्ट्रात २० टक्केही नाही, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.