महाराष्ट्रात होऊ शकते या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती! ही आहे संभाव्य नवीन जिल्ह्याची यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र निर्मितीमध्ये भाषावर प्रांत रचनेची मागणी खूप महत्त्वपूर्ण ठरली हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेस भाषावार प्रांतरचना करण्यात आली तेव्हा मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून एक मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांसह नवीन मराठी भाषेत राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे ला 26 राज्यांसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व त्यानंतर साधारणपणे वीस वर्षाच्या कालावधीनंतर यामध्ये आणखी दहा नवीन जिल्ह्यांची भर टाकण्यात आली.

परंतु या व्यतिरिक्त आता अजून काही जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हे अस्तित्वात आणावेत अशा प्रकारची मागणी कित्येक दिवसापासून जोर धरत आहे. जर प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केला तर काही जिल्ह्यांवर प्रशासकीय कामांचा खूप मोठा ताण आहे

व जर एखाद्या गावातुन जर जिल्हा मुख्यालयाला काही काम असेल तर त्यांना संपूर्ण दिवस वाया घालून काम पूर्ण करावे लागते. अशा अनेक प्रकारच्या समस्या सध्या दिसून येतात. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासकीय काम सुलभ व्हावे याकरिता नवीन 22 जिल्हे तयार करण्याचे नियोजन सध्या आखण्यात येत असून 22 जिल्ह्यांची मागणी शासनाकडे प्रस्तावित आहे.

 हे आहेत नवीन प्रस्तावित 22 जिल्हे

1- यामध्ये नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

2- सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे नव्याने तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

3- ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची योजना असून यामधून मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते.

4- ठाणे जिल्ह्यामधून तयार करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्याचे देखील विभाजन होऊ शकते व या जिल्ह्यातून जव्हार हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

5- पुणे जिल्ह्यातून शिवनेरी हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

6- रायगड मधून महाड जिल्हा तयार केला जाण्याचे प्रस्तावित आहे.

7- सातारा जिल्ह्यातून माणदेश जिल्हा तयार केला जाऊ शकतो.

8- रत्नागिरी मधून मानगड जिल्हा तयार करण्याचे एकंदरीत नियोजन आहे.

9- बीडमधून आंबेजोगाई जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.

10- लातूर जिल्ह्यामधून उदगीर जिल्हा तयार करण्याची प्लॅनिंग आहे.

11- नांदेड जिल्ह्यातून किनवट जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.

12- जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

13-बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव जिल्हा तयार होऊ शकतो.

14- अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर हा नवीन जिल्हा निर्माण होऊ शकतो.

15- यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

16- भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

17- चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन प्रस्तावित असून त्यातून चिमूर हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

18- गडचिरोली या जिल्ह्याचे विभाजन करणे प्रस्तावित असून त्यातून अहेरी हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.

अशा प्रकारे नवीन 22 जिल्हे प्रस्तावित असून येणाऱ्या काळात याबद्दल काय निर्णय घेतला जातो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.