गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडीतील मुक्काम वाढणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर काल एसटी कर्मचाऱ्यांचे (ST staff) आक्रमकपणे आंदोलन केले आहे, त्यामुळे या घटनेचा राष्ट्रवादीकडून (Ncp) संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेतील एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सादवर्ते (Gunratan Sadavarte) यांना पोलिसांनी (Police) अटक केली असून आज त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज झालेल्या सुनवाणीत कोर्टाने सदावर्तेंना कोठडी मुक्कामी पाठवले आहे.

सदावर्ते यांनी केलेल्या भाषणामुळे हे आंदोलन भडकल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे. कोर्टाबाहेर यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी जमले आहेत.

यात तब्बल १०९ जणांना आरोपी करण्यात आले आहे. सदावर्ते यांचा या हल्ल्यात कोणताही प्रत्यक्ष सहभाग नव्हता, आणि घरात घुसू असेही सदावर्ते बोलले नाहीत, असा युक्तीवाद यावेळे सदावर्तेंचे वकील वासवानी यांनी केला आहे.

दरम्यान, आज अटक झालेल्या १०९ आंदोलकांचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मात्र गुणरत्न सदावर्तेंचा मार्ग आता आणखी खडतर होऊन बसला आहे.

हे आंदोलन भडकवण्यात सदावर्तेंचा सहभाग कसा होता, सदावर्ते यांनी आणखी काही हलचाली पडद्यामागून केल्या होत्या का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना ही कोठडी मिळाली आहे.

तसेच सदावर्ते यांनी मला उच्च रक्तदाब आणि मदूमेहाचा त्रास आहे, असे सदावर्ते यांनी कोर्टात सांगितल्या नंतर न्यायालयाने त्यांना कोठडीत औषधं (Medicine) देण्याची परवानगी कोर्टाने (Court) दिली आहे.

त्याचसोबत गुणरत्न सादवर्ते यांची न्यायालयाने खुद्द तपासणीही केली असून त्यांना कुठे जखमा झाल्या आहेत का? त्यांना धक्काबुक्की झाली आहे का? याची पाहणी कोर्टाने केली आहे.