अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- स्वत:ला बाळूमामांचा वंशज, अवतार म्हणविणारा उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा गायब झाला आहे. उंदरगावातील मनोहरमामा याने उभारलेल्या बाळूमामांच्या मंदिराला कुलूप लावले असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.त्यामुळे उंदरगावात आता सन्नाटा पसरला आहे.

बाळू मामा चा अवतार आहे,असे म्हणविणारा मनोहर मामा गायब ! करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथें असलेल्या बाळू मामा च्या मंदिराला सध्या कुलुप लावण्यात आले आहे. यामुळे बाळू मामा चे सध्या भक्तांसाठी बंद असले,तरी मी बाळू मामा चा अवतार आहे,असे म्हणविणारा मनोहर मामा मात्र गायब झाला आहे, यामुळे करमाळा तालुक्यात अनेक तर्क वितर्क रंगविले जात असून चर्चाना मात्र मोठे उधाण आले आहे.

चेल्यांकरवी पद्धतशीर प्रचार करून झाला मोठा :- स्वतःला आदमापूर च्या बाळू मामाचा वंशज आणि अवतार म्हणविणारा मनोहर भोसले याने बाळूमामा आपल्याला प्रसन्न असून त्यांच्या आशीर्वादाने अनेकांचे प्रश्न मार्गी लागतात, असा दावा करत होता. चेल्यांकरवी याचा पद्धतशीर प्रचार करून मनोहर भोसले याने आपण महाराज असल्याची ख्याती निर्माण केली. त्यातून समस्यांग्रस्त जनतेला संकट दूर करतो, असे सांगून जाळ्यात ओढले आहेत.

परिसरातील जिल्ह्यासह परराज्यातही भक्तगणांची रीघ :- करमाळा तालुक्यातील उंदरगावात सोलापूर, अहमदनगर, लातूर, पुणे, मनमाड, भुसावळ आदी राज्यातील तसेच कर्नाटकातीलही भक्तगणांची रीघ लागत असे. मनोहर महाराजाच्या अंधश्रद्धायुक्त कारनाम्याने बाळूमामाचे मूळ समाधी असलेल्या आदमापुरात त्याचा निषेधाचा ठराव करून भक्तगणांनी फसवू नये, असे आवाहन केले आहे.

बाळूमामांचा वंशज आणि शिष्य म्हणून बनाव :- संत बाळूमामा म्हणजे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान. त्यांचं मूळ स्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपुरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र आता त्यांच्या नावानं एका नव्या बाबानं बस्तान मांडल्याचा आरोप होतोय. मनोहर भोसले असं या बाबाचं नाव. करमाळा तालुक्यातल्या उंदरगावचा मनोहर भोसले स्वत:ला बाळूमामांचा वंशज आणि शिष्य म्हणून बनाव करत असल्याचा आरोप कोल्हापूरच्या आदमापूर ग्रामपंचायत आणि बाळूमामा देवालय़ ट्रस्टनं केला होता.

मनोहर भोसलेविरोधात अनेक पुरावेही गोळा :- बाळूमामांनी समाधी घेतलेल्या आदमापूरच्या ग्रामस्थांनी या भोसलेबाबाविरोधात जोरदार मोहीम सुरु केली. यातच बाळूमामांचे कुणीही वंशज नसल्यामुळं त्यामुळे मनोहर भोसले आणि बाळूमामांचा कोणताही संबंध नसल्याचा ठरावच ग्रामपंचायतीनं केला होता. मनोहर भोसलेविरोधात अनेक पुरावेही गोळा केले होते.

पत्नीच्या नावावर तब्बल २७ एकरांची जमीन खरेदी :- मनोहर मामाने नुकतेच आपल्या पत्नीच्या नावावर तब्बल २७ एकरांची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आपल्या मुलांच्या नावे देखील काही ठिकाणी संपत्ती जमा केल्याचे समोर आले आहे. यासंबंधी माहिती लोकमत मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

आश्रमाचे मोठे बांधकाम सुरू :- करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील उंदरगाव गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मनोहर महाराजाचा आश्रम आहे. सध्या आश्रमाचे मोठे बांधकाम सुरू आहे. याच मनोहर मामाचा आधी दौंड येथे मठ होता, यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यावर मामा या ठिकाणाहून गायब झाला. यासोबत माामाचा बारामती नजिक सावंतवाडी या ठिकाणी देखील मठ आहे. पण सध्या मामाने आपले बस्तान उंदरगाव येथे बांधले आहे.

भोंदू मामावर नेमकी काय कारवाई होणार?  दरम्यान, जमीनी बळकावून घेणे, गुंडाच्या मार्फत धमक्या देणे, बंदूकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावणे असे अनेक आरोप सध्या मनोहर मामावर आहेत, यामुळे आता या भोंदू मामावर नेमकी काय कारवाई होणार? याकडे सर्वांंचे लक्ष लागलेले आहे.

एकवीस हजार रुपयांपर्यंतची देणगी गोळा :- भविष्य पाहण्यासाठी येणाऱ्या भक्ताकडून तीन हजारापासून ते एकवीस हजार रुपयांपर्यंतची देणगी गोळा केली जात असल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. आश्रमात राजकीय नेते मंडळी व बडे अधिकारी नियमित येत असल्याने कोणी जाहीरपणे विरोध व तक्रार करु शकत नव्हते. आता मात्र अनेकजण पुढं सरसावू लागलेत.

आदमपूर ग्रामपंचायतीचा निषेधाचा ठराव :- उंदरगाव (ता. करमाळा) येथे वास्तव्यास असलेले मनोहर भोसले या महाराजांना अनेक राजकीय बड्या नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. याबरोबर राज्यातून अनेकजण दर्शनासाठी येतात. मात्र सध्या हे प्रकरण वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहे. आदमपूर ग्रामपंचायतीने त्यांच्या विरोधात निषेधाचा ठराव केला आहे.

भक्तांची लूट करणे हे श्री बाळूमामांच्या तत्त्वात बसत नाही ! आदमपूर ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी भोसले यांच्याविषयी तक्रारी आलेल्या आहेत. याशिवाय बाळू मामाचे नाव सांगून आपले आर्थिक हितसंबंध जोपासत आहोत. श्री बाळूमामाची शक्ती, श्रद्धा, भजन, कीर्तन इतकेच हे क्रमप्राप्त आहे. मात्र अशाप्रकारे भक्तांची लूट करणे हे श्री बाळूमामांच्या तत्त्वात बसत नाही. त्यांनी आपले संपूर्ण अवतार काळात कोणाकडूनही एक दाम घेतला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने भोसले यांचा धिक्कार व निषेध केला आहे.

जाळ्यात ओढून अनेक गैरप्रकार केल्याची ही चर्चा :- स्वतःच्या चेल्या करवी याचा पध्दत शिरपणे प्रचार करून मनोहर भोसले याने आपण महाराज असल्याची ख्याती निर्माण केली होती,त्यातून समस्या ग्रस्त संकटग्रस्त लोकांना तुमचे संकट दूर करतो, असे सांगून जाळ्यात ओढून अनेक गैरप्रकार केल्याची ही चर्चा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तसेच सांगली आणि नगर जिल्ह्यात सुरू आहे.

मनोहर भोसले याचा फोटो त्वरित काढा ! दरम्यान एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील मनोहर भोसले याचा फोटो त्वरित काढा; अन्यथा तीव्र आंदोलन उभा करू व मालिका प्रसारण बंद पाडू, असा इशारा आदमापूर ग्रामस्थांसह बाळूमामा भक्तांनी दिला आहे, ग्रामपंचायतीच्या वतीने तशी मागणी करणारे पत्र निर्माता संतोष आयाचित यांना पाठवले आहे. याबरोबरच बाळूमामा देवालय समितीच्या वतीनेही भोसले याचा निषेध करण्यात आला आहे.