Milind Narvekar : चर्चा तर होणारच! गेले मिलिंद नार्वेकर कुणीकडे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Milind Narvekar : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे गेल्या अनेक दशकांपासून विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर सध्या फारसे सक्रीय दिसत नाहीत. त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांची खासदार श्रीकांत शिंदे शिंदे यांच्यासोबत भेट आणि अर्धातास चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

त्यामुळे नार्वेकर यांच्याबाबतही सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील उभी फूट पडल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे गेल्या काही दिवसांपासून फारसे सक्रिय नसल्याचे दिसून येते.

नुकतीच नार्वेकर यांची एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत विधिमंडळ परिसरात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकरांनी श्रीकांत शिंदें यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबतही त्यांची मैत्री आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मिलिंद नार्वेकर हेदेखील उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेत आतापर्यंत जी बंड झाली, त्यावेळी नार्वेकर यांच्यावर आरोप झाले. तेच ठाकरे यांची भेट हेऊ देत नसल्याचा आरोप प्रत्येकवेळी झाला. मात्र आता त्याच मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत बंडखोरांसोबत संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.