पुणे अपघात प्रकरणात आमदाराच्या मुलाचाही समावेश? पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर

Ajay Patil
Published:
Porsche accident

पुणे अपघात प्रकरण सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. सुरवातीला अगदी थोडक्यात हे प्रकरण संपवले जात असताना सोशल मीडियाने हे प्रकरण उचलून धरले आणि याची दाखल राज्यकर्त्यांसह प्रशासनालाही घ्यावी लागली.

हे प्रकरण जसजसे उलगडत गेले तसतसे नवनवीन कांगोरे या प्रकरणाचे समोर आले. या प्रकरणी आता ससूनच्या काही डॉक्टरांनाही ताब्यात घेतले गेले आहे. आता या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप देखील वाढू लागले आहेत.

आता या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले आहेत की, अपघत घडला तेव्हा पबमधून दोन गाड्या निघालेल्या होत्या. त्या दोन गाड्यांत ही रेस लागलेली होती. या दोन्हीतील एक गाडी पुढे निघून गेली व मागील गाडीने दोघांना चिरडले.

धनिकपुत्राच्या पोर्शे गाडीसोबत जी दुसरी गाडी निघून गेली होती त्यात एका आमदाराचा मुलगा होता असा दावाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. दुसरीकडे या घटनेतील सध्या पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या डॉ. तावरेंनी सर्वांची नावं समोर आणेल असे म्हटले होते.

त्यामुळे त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे म्हणत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीये. नाना पटोले यांनी पुढे असेही म्हटले की, चिरडणाऱ्या पोर्शे कार सोबत जी कार पुढे निघून गेली त्यात एका आमदाराचा मुलगा होता. .

त्यामुळे आता तो आमदार कोण हे मुख्यमंत्री यांनी सर्वाना सांगितले पाहिजे. तसेच डॉ. तावरे याप्रकरणाचे साक्षीदार असून त्यांना या गोष्टींबद्दल पुरेशी माहिती आहे. पोलीस आणि डॉक्टर यांना कोण मॅनेज करत होते ते देखील तपासले पाहिजे असे ते म्हणाले.

तसेच डॉ. तावरे यांना सुरक्षा पुरवली पाहिजे. या घटनेत ज्या पद्धतीने पुरावे नष्ट करण्यात आले किंवा तसे प्रयत्न केले गेले त्यावरुन ही घटना हायप्रोफाईल असल्याचेही पटोले म्हणालेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe