Mumbai Trans Harbour Link:- भारताची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या शहरामध्ये अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू असून वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प खूप महत्त्वाचे आहेत. मुंबईमध्ये जी काही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते ती समस्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प उभारले जात आहेत.
अनेक रस्ते तसेच उड्डाणपूल व मेट्रो प्रकल्पांची कामे मुंबईत सुरू असून या पायाभूत प्रकल्पांमधील सर्वात महत्त्वाचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प देखील एक महत्त्वाचा प्रकल्प असून हा देशातील सर्वात मोठा समुद्रात उभारला जाणारा पूल आहे. येणाऱ्या कालावधीत लवकरच हा लोकांकरिता खुला होईल अशी एक अपेक्षा आहे.
जर आपण मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा विचार केला तर यामुळे मुंबईकरांना दक्षिण मुंबई ते नवीन एअरपोर्ट आणि मुंबई ते पुणे या प्रवासात वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळण्यास मदत होणार आहे व 30 ते 45 मिनिटांचा वेळ वाचू शकणार आहे. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची महत्वाची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.
भारतातील सर्वात मोठा सागरी सेतूची वैशिष्ट्ये
1- करण्यात आला आहे आर्थोट्रापिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर– हा सागरी पूल भारतातील पहिला सागरी फुल असणार आहे जो आर्थोट्रॉपिक स्टील डेक तंत्रज्ञानाच्या आधारे उभारण्यात आलेला आहे. यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लींक समुद्रपूल हा जगातील सर्वात मजबूत पुलांपैकी एक असणार आहे.
2- काँक्रीटचा सर्वाधिक वापर– मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा सागरी सेतू उभारण्याकरिता तब्बल नऊ लाख 75 हजार घनमीटर काँक्रीट चा वापर करण्यात आला असून जगातील सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी साठी जेवढे काँक्रीट वापरण्यात आलेले आहे त्यापेक्षा सहा पट अधिक काँक्रेटचा वापर मुंबई ट्रांस हार्बर लिंकसाठी करण्यात आलेला आहे. यावरून आपल्याला या सागरी सेतूची भव्य दिव्यता लक्षात येते.
3- या फायद्यांमुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ठरेल महत्वाचा– मुंबई ट्रांस हार्बर लिंकमुळे मुंबई ते पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडून पुणे, बेंगलोर आणि गोवा या प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ हा कमी होणार आहे. तसेच यामुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यान जो काही प्रवास करण्याकरिता एक तासाचा कालावधी लागतो तो सोळा मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्याला मुख्य शहराच्या जवळ आणण्यास देखील मदत होणार आहे. काही दिवसांमध्ये नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला चांगली कनेक्टिव्हिटीचा पर्याय देखील या माध्यमातून मिळणार आहे.
4- देशातील सर्वात लांब पूल– मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आता देशातील सर्वात लांब सागरी पूल म्हणून देखील ओळखला जाणार आहे. या पुलाच्या बांधकामाकरिता अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असून हे तंत्रज्ञान देशांमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आलेले आहे.
5- 22 किलोमीटर लांबीचा आहे हा पूल– मुंबई ट्रांसफार्मर लिंक सागरी सेतू हा 22 किलोमीटर लांबीचा असून त्यातील तब्बल 16.5 किलोमीटर लांबीचा पूल हा समुद्रामध्ये आहे. या पुलाचे एकूण वजन 2300 मॅट्रिक टन आहे.