Nagpur-Mumbai Bullet Train: नागपूर- मुंबई दरम्यान होणार बुलेट ट्रेन! वाचा कोणत्या शहरांमधून जाईल ही ट्रेन आणि तिचे वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur-Mumbai Bullet Train :- अनेक मोठे मोठे रस्ते प्रकल्प आणि रेल्वे प्रकल्पांच्या माध्यमातून देशातील आणि राज्य राज्यातील मोठ-मोठे शहरातील अंतर आता कमालीचे कमी होत आहे. वाहतुकीच्या प्रगत सुविधा निर्माण केल्यामुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास देखील झपाट्याने होण्यास मदत होणार आहे. तसेच कोणत्याही दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी झाल्यामुळे  प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

याच अनुषंगाने जर आपण बुलेट ट्रेनचा विचार केला तर अहमदाबाद ते मुंबई हा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प उभारला जात असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबादच नाही तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप मोठा हातभार लागणार आहे.

याच धर्तीवर आता महाराष्ट्राची राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानी असलेली मुंबई व महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर यांच्या दरम्यानचा प्रवास वेगवान होणार असून या दोन्ही शहरा दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प साकारला जाणार आहे. नेमका हा प्रकल्प कसा असणार आहे? कोणत्या शहरांमधून हा बुलेट ट्रेन प्रकल्प जाईल? इत्यादी बद्दल माहिती आपण पाहणार आहोत.

 मुंबईनागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प

मुंबई आणि नागपूर हे दोनही महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून या शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले होते व ते बरेचसे पूर्ण देखील झाले. याच समृद्धी महामार्गाला समांतर असा नागपूर ते मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून या रेल्वे मार्गाचा डीपीआर देखील तयार करण्यात आला आहे व तो रेल्वे बोर्डाकडे सादर झालेला आहे.

आता रेल्वे बोर्ड या सविस्तर प्रकल्प अहवालाचा म्हणजेच डीपीआरचा सगळा अभ्यास करून तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे व केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता देणे गरजेचे आहे. परंतु केंद्र सरकार याला कधी मान्यता देईल? हे येणारा काळच ठरवणार आहे.

कारण केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच या बुलेट ट्रेन मार्गाचे काम होऊ शकणार आहे. नागपूर-मुंबई हाय स्पीड बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित कामाला गती मिळाल्याची महत्त्वपूर्ण माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुषमा गौर यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिली.

 नागपूरमुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प कसा असणार आहे?

जर या प्रकल्पाचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल पाहिला तर त्यानुसार या प्रकल्पाची एकूण लांबी 742 किलोमीटरचे असून समृद्धी महामार्गाला समांतर असा हा प्रकल्प असणारा असून त्यामुळे यासाठी आवश्यक जमीन देखील कमी लागणार आहे. या प्रकल्प करता 1250 हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. हा प्रकल्प राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जाणारा असून या व्यतिरिक्त इतर 13 जिल्ह्यांना देखील याचा अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.

या बुलेट ट्रेन मार्गावर 15 स्टेशन प्रस्तावित आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, शहापूर, घोटी, नासिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा, लाड, पुलगाव, वर्धा, खापरी आणि अजनी या शहरांचा यामध्ये समावेश आहे. सध्या जर आपण नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ पाहिला तर तो बारा ते पंधरा तास इतका लागतो. परंतु हा बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांमध्ये हे अंतर पूर्ण करता येणार आहे.

जर आपण बुलेट ट्रेन चा ताशी वेग पाहिला तर या मार्गावर तो 320 किलोमीटर असणार असून प्रत्यक्षात 250 किलोमीटर प्रतितासाचा वेग आपल्याला मिळणार आहे. प्रकल्पाकरिता लागणारा खर्च हा एका किलोमीटर करता 200 कोटी रुपये इतका येणार आहे व एकूण एक ते दीड लाख कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून याचा प्रस्ताव 2019 मध्ये तयार करण्यात आला होता. मार्च 2021 मध्ये या प्रकल्पाचा हवाई लीडर सर्वे देखील करण्यात आला असून नोव्हेंबर 2021 ला या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्याला सुरुवात झाली होती व मार्च 2022 ला डीपीआर तयार करून रेल्वे बोर्डाकडून तो सादर करण्यात आला आहे.

लवकरच रेल्वे बोर्ड सविस्तर अभ्यास करेल व नंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे राज्यातील 11 जिल्ह्यांच्या विकासामध्ये खूप मोठा हातभार लागणार आहे. हा दहा जिल्ह्यातून जाणारा बुलेट ट्रेन मार्ग असून 250 किमी वेगाने धावणारी ही ट्रेन 14 स्थानकांवर केवळ एक मिनिटासाठी थांबणार आहे. ह्या बुलेट ट्रेनचा मार्ग हा महाराष्ट्रातील वर्धा, खापरी डेपो, पुलगाव, मालेगाव, जहांगीर, जालना, कारंजा लाड, मेहकर, शिर्डी, नासिक, औरंगाबाद, इगतपुरी आणि शहापूर असा असणार आहे.