नाशिक-ठाणे प्रवास करणे आता होईल अतिशय सोपे! नाही लागणार आता कसारा घाट,मिटेल वाहतूक कोंडीचे टेन्शन आणि प्रवास होईल फास्ट

महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचा रस्ते प्रकल्प जर बघितला तर तो समृद्धी महामार्ग हा आहे. आता या महामार्गामुळे नाशिक वरून मुंबई किंवा ठाण्याला जाताना जो काही प्रवासामध्ये कासारा घाटामध्ये प्रवासाचा त्रास व्हायचा तो मात्र आता होणार नाही.

samrudhi mahamarg

Samrudhi Mahamarg:- महाराष्ट्रमध्ये बऱ्याच ठिकाणी महत्वाचे असे रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत व यासोबतच मुंबई तसेच इतर मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशा प्रकारची ही रस्ते प्रकल्प किंवा उड्डाणपुलांची कामे वाहतूक कोंडीतून सुटका होण्याच्या दृष्टिकोनातून आणि वेगवान प्रवासाकरिता खूप फायदेशीर ठरणार आहेत.

या सगळ्या प्रकल्पांमध्ये जर आपण महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचा रस्ते प्रकल्प जर बघितला तर तो समृद्धी महामार्ग हा आहे. आता या महामार्गामुळे नाशिक वरून मुंबई किंवा ठाण्याला जाताना जो काही प्रवासामध्ये कासारा घाटामध्ये प्रवासाचा त्रास व्हायचा तो मात्र आता होणार नाही.

कारण या ठिकाणी असणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवास करताना प्रवाशांना खूपच त्रासदायक व्हायचे. परंतु आता लवकरच ठाण्यातून नाशिकला जाताना किंवा येताना कसारा घाट लागणार नाही. विशेष म्हणजे हा प्रवास फक्त प्रवाशांना आठ मिनिटात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.

समृद्धी महामार्गाचे काम सध्या खूप वेगात सुरू असून जवळपास इगतपुरी ते आमने हा शेवटच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. जेव्हा या टप्प्याचे काम पूर्ण होऊन या ठिकाणी वाहतूक सुरू होईल तेव्हा इगतपुरी वरून ठाणे किंवा आमने गाठायला फक्त सव्वा तास लागणार आहेत व ठाणे ते नाशिक प्रवास फक्त अडीच तासात पूर्ण करता येणार आहे.

प्रवासात यामुळे टाळता येईल कासारा घाट
सध्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू असून या टप्प्यामध्ये एकूण पाच बोगद्यांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. इगतपुरी ते आमने हा या मार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा असून यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इगतपुरी या ठिकाणी असणारा आठ किलोमीटर लांबीचा बोगदा होय.

या बोगद्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा बोगदा असणारा असून यामुळेच ठाणे नाशिक प्रवास करताना कसारा घाटातून आता प्रवास करावा लागणार नाही.

बारा किलोमीटरचा कसारा घाट असून तो पार करण्यासाठी एक तासापेक्षा जास्त कालावधी लागतो. परंतु जेव्हा समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा सुरू होईल व या बोगद्याचे काम पूर्ण होईल तेव्हा या बोगद्यातून आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार होणार आहे.

आता हा 76 किलोमीटरचा अंतिम टप्पा असून समृद्धी महामार्गावरील सगळ्यात मोठा आव्हानात्मक कामांचा हा टप्पा आहे. यामध्ये तब्बल 17 दऱ्या आहेत व तब्बल 17 पूल या ठिकाणी उभारले जात आहेत. या सगळ्या पुलांची एकत्रित लांबी 11.5 किलोमीटर आहे.

यामध्ये भातसा नदीवर 2.28 किलोमीटर लांबीचा व्हॅली पूल उभारण्यात आला असून तो सर्वाधिक लांबीचा पूल आहे. आतापर्यंत जर बघितले तर नागपूर ते नाशिक जिल्ह्यातील भरविर इंटरचेंजपर्यंत एकूण 625 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे व आता फक्त शेवटचा टप्पा जो काही 76 किलोमीटर लांबीचा आहे तो टप्पा वाहतुकीसाठी खुला होणे फक्त बाकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe